गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई
भरत जाधव
Updated May 04, 2022 | 13:27 IST

भाजप आमदार (BJP MLA) गणेश नाईक (Ganesh Naik) यांना उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) मंजूर करण्यात आला. बलात्कार, फसवणुकीच्या आरोपांखाली गणेश नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Naik on pre-arrest bail on caste bond of Rs 25,000
गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नाईकांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल
  • 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

Ganesh Naik :  मुंबई :  भाजप आमदार (BJP MLA) गणेश नाईक (Ganesh Naik) यांना उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) मंजूर करण्यात आला. बलात्कार, फसवणुकीच्या आरोपांखाली गणेश नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आणि फसवणुकीचा आरोप केला होता. नेरुळ पोलीस ठाण्यात नाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान संबंधित महिलेला धमकावल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. सीबीडी पोलिसांना नाईकांविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर नाईकांनी अटक पूर्व जामीन केला होता, परंतु न्यायालयायने जामीन नाकारला होता. 
  

नेमकं प्रकरण काय? 

गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. त्यानंतर नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी