Wards Of Mumbai Municipal Corporation : शिंदे सरकारला हायकोर्टाचा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या 227 राहणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2023 | 15:56 IST

High Court relief to Shinde government, number of wards of Mumbai Municipal Corporation will remain 227 : मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या (वॉर्ड संख्या) 236 वरून 227 करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबईच्या हायकोर्टाने फेटाळल्या.

Wards Of Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या 227 राहणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शिंदे सरकारला हायकोर्टाचा दिलासा
  • मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या 227 राहणार
  • हायकोर्टाने शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन्ही रिट याचिका फेटाळल्या

High Court relief to Shinde government, number of wards of Mumbai Municipal Corporation will remain 227 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाला मुंबईच्या हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या (वॉर्ड संख्या) 236 वरून 227 करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबईच्या हायकोर्टाने फेटाळल्या.

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी रिट याचिका करून शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवत असल्याचे हायकोर्टाने 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केले होते. यानंतर आज (सोमवार 17 एप्रिल 2023) न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठाने निर्णय जाहीर केला. 

महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर शिंदे सरकारने आधी वटहुकूम (अध्यादेश) काढून आणि नंतर कायद्यात फेरबदल करून प्रभागांची संख्या पुन्हा 227 केली. या निर्णयालाच रिट याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. पण दोन्ही याचिकांमधील मुद्द्यांत तथ्य दिसत नसल्याचे सांगत हायकोर्टाने त्या फेटाळल्या. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या आता 227 राहणार आहे. 

सोमवारी या चुका टाळा नाहीतर होईल मोठे नुकसान

शंकराला प्रसन्न करून आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी