मुख्यमंत्र्यांनी केली समृद्ध महामार्गाची पाहणी, १ मे पर्यंत नागपूर-शिर्डी टप्पा सुरू होणार

Samruddhi Highway project: समद्धी महामार्गाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू असून हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल

HinduHriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway project is on fast track
मुख्यमंत्र्यांनी केली समृद्ध महामार्गाची पाहणी, १ मे पर्यंत नागपूर-शिर्डी टप्पा सुरू होणार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरुन करू शकू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची (HinduHriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway) अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) (Shivni Rasulpur in Amravati) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज प्रथमच मी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल असं काम आपण केलेलं असेल.

१ मेपर्यंत नागपूर-शिर्डी टप्पा पूर्ण होईल 

नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोहळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण हे काम गतीने करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरुन करू शकू (We will be able to travel from Nagpur to Shirdi on this highway by coming 1st May).

या मार्गातं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अमरावती येथे पाहणी केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेतला तसेच समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॅकेज १० अंतर्गत कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी