Maharashtra Day 2022 in Marathi : म्हणून १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारतात भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी तयार केलेल्या प्रशासकीय विभागानुसार भारत विभागलेला होता. मराठी भाषिकांचे एक महाराष्ट्र व्हावे अशी मागणी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून व्हावे अशी मागणी होत होती. सुप्रसिद्ध लेखक गं.त्र्य.माडखोलकर यांनी १९४६ साली तशी मागणीही केली होती.

maharashtra day 1960
महाराष्ट्र दिन 1960 
थोडं पण कामाचं
  • १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
  • यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.
  • जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास.

Maharashtra Day 2022 in Marathi   मुंबई : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारतात भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी तयार केलेल्या प्रशासकीय विभागानुसार भारत विभागलेला होता. मराठी भाषिकांचे एक महाराष्ट्र व्हावे अशी मागणी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून व्हावे अशी मागणी होत होती.

अधिक वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त आवर्जून ऐका ही गौरवं गीते

सुप्रसिद्ध लेखक गं.त्र्य.माडखोलकर यांनी १९४६ साली तशी मागणीही केली होती. फक्त मराठी भाषिकांनीच नव्हे तर तेलुगु, तमिळ, कानडी भाषिकांनीही भाषावार प्रांतरचना करून आपल्या राज्याची मागणी केली होती. तेलुगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेशची निर्मिती व्हावी यासाठी ज्येष्ठ गांधी वादी नेते श्री पोट्टी रामल्लू यांनी उपोषण सुरू केले. अखेर उपोषणात त्यांचे निधन झाले. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये दंगल उसळली. राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला.

अधिक वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा

अखेर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना तेलुगु भाषिकांचा संयुक्त आंध्र प्रदेशची निर्मिती करावी लागली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आणखी जोर धरला. महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नव्हता तर राजधानी मुंबईचाही प्रश्न होता. तेव्हा महाराष्ट्र हे राज्य अस्तित्व नव्हते तर मुंबई प्रांत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाहे हा प्रदेश ओळखा जायचा. ब्रिटिशांच्या काळात तसेच फाळणीपूर्वी मुंबई प्रांताची सीमा तेव्हाचा पंजाब तर आताच्या पाकिस्तानपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यात गुजरात राज्याचाही समावेश होता.

गुजराती भाषिकांनी आधी मुंबईवर आपला हक्क सांगितला. त्यामुळे मराठी माणसांनी या विरोधात आवाज उठवला. प्र.के.अत्रे, प्रबोधन ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमरशेख  आणि कॉ. डांगे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी अत्रे यांनी मराठा नावाचे दैनिक काढले होते. १९५७ साली पंडित नेहरु प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. 

तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी फ्लोरा फाऊंटनवर आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात असे द्वैभाषिक राज्य होते. या राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी अशा प्रकारे १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. १९५७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात जोरदार फटका बसला. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाणही कमी मताधिक्क्याने जिंकून आले होते. अखेर यशवंतराव चव्हाण यांनी नेहरुंना संयुक्त महाराष्ट्राची गरज पटवून दिली. १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र हा कामगारांनी आणि कष्टकर्‍यांनी लढवून मिळवला आहे, म्हणून १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी