Holi Special Trains from Mumbai: होळी आणि धुलिवंदन या सणांसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावाकडे जात असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून 34 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त 26 गाड्या चालवण्यात येणार आहेत.
होळी निमित्त मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 26 गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी, मंगळुरू, करमाळी या भागात सोडण्यात येणार आहेत. मध्यरेल्वेकडून यापूर्वीच 105 होळी स्पेशल ट्रेन्स चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता अतिरिक्त ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होळी निमित्त सोडण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेन्सची संख्या 131 इतकी झाली आहे.
हे पण वाचा : प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची ही आहेत लक्षणे
हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
हे पण वाचा : या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस
आरक्षण - स्पेशल ट्रेन्सच्या बुकिंगसाठी 01467, 01165/01166 आणि 01187/01188 सर्व कम्प्युटर आरक्षित केंद्रांवर आणि वेबसाईट www.irctc.co.in वर ओपन करा. या संदर्भातील अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.