मुंबईकरांना आजपासून मिळणार घरपोच दारु! 

Mumbai liquor home delivery: मुंबईत कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणी दारूच्या होम डिलीव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. 

home delivery of liquor will be possible from today in mumbai restrictions continue in containment zone
मुंबईकरांना आजपासून मिळणार घरपोच दारु!   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुंबईत आजपासून दारुची होम डिलिव्हरी
  • मुंबईतील कंटेनमेंट झोन वगळता सगळीकडे करता येणार होम डिलिव्हरी
  • मुंबई महापालिकेच्या निर्णयानंतर आजपासून घरपोच मद्य विक्री

मुंबई: मुंबईत आजपासून (२३ मे) दारुची होम डिलिव्हरी सुरु होणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने घेतला आहे. कंटेनमेंट झोन वगळता दारूची होम डिलिव्हरी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या सहकार्याने नोंदणीकृत मद्याची दुकाने होम डिलिव्हरी करु शकतात.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक यंत्रणा आणली होती, ज्यामध्ये ग्राहक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ग्राहक टोकन घेऊ शकत होते. त्यानंतर टोकनवर नमूद केलेल्या तारखेस आणि वेळेत ग्राहकांना नोंदणीकृत दुकानातून मद्य मिळत होतं. पण ही व्यवस्था मुंबईकरांना लागू नव्हती. महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, मुंबईतील कोणत्याही दुकानातून काउंटरवर दारू विक्री होणार नाही.

नव्या यंत्रणेमध्ये दारूची होम डिलीव्हरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन केली जाईल. दरम्यान, संबंधित सर्व परवानग्या घेतल्यानंतर स्विगी आणि झोमॅटो यांनी झारखंडमध्ये दारूची होम डिलीव्हरी सुरू केली आहे. हेच मॉडेल अन्य राज्यांमध्येही लागू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने ४ मेपासून मुंबईतील दारूच्या दुकानांसह अनेक अनावश्यक सेवांना परवानगी दिली होती, त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांचा वावर सुरु झाला. या दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन झाले नाही. त्यानंतर मुंबईतील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वेगाने पसरतोय कोरोना

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे सर्वाधिक २९४० नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात संक्रमित लोकांची संख्या ४४५८२ वर जाऊन पोहोचली. मुंबईत १७५१ नवे रुग्ण सापडले आहेत. या काळात राज्यात कोव्हिड-19 मुळे ६३ लोकांचा मृत्यू झाला. यातील २७ जणांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे राज्यात मृतांचा आकडा १५१७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत विविध रुग्णालयांमधून उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या १२५८३ एवढी आहे. आतापर्यंत मुंबईत २७२५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून ९०९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी