गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 28, 2021 | 10:33 IST

Home Minister  Walse-Patil Corona Positive : मुंबई : राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil ) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे.

Home Minister Dilip Walse-Patil infected with corona
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण   |  फोटो सौजन्य: Times Now

Home Minister  Walse-Patil Corona Positive : मुंबई : राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil ) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. याविषयीची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर (Twitter) अंकाऊटवरुन दिली आहे.  दरम्यान त्यांची तब्येत ही स्थिर आहे.  वळसे-पाटील यांना काही सामान्य लक्षणे जाणवून येत होती त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्लानुसार उपचार घेत असल्याचं पाटील म्हणाले आहेत. यासोबत त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आप-आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं सांगितलं आहे. 

काही दिवसांपूर्वी ते अमरावती आणि नागपूर दौऱ्यावर होते. या दोन्ही दौऱ्यात आपल्यालाजे कोणी भेटायला आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन  घ्यावी असी सुचना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४३,३४२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५३% एवढे झाले आहे. आज राज्यात  १४८५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी