Devendra Fadnavis : कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहिजेत. भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) पार्श्वभूमीवर दिला. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे फडणवीसांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (Home Minister rein in Uddhav Thackeray's speech, stay within the framework, otherwise..)
अधिक वाचा : सट्टेबाजीची जाहीरात दाखवल्यास OTT प्लॅटफॉर्मचं फुटणार नशीब
दरम्यान उद्या पंकजा मुंडे आणि आरएसएस, शिवसेना आणि नव्याने निर्माण झालेल्या शिंदे-गटाचा मेळावा असणार आहे. या मेळाव्यातून प्रत्येकजण आप-आपली रणनीती आणि विरोधकांवर टीका-टिप्पणी करेल. परंतु शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा आणि उद्धव ठकारेंच्या भाषणाची धास्ती भाजप अन् सरकारनं चांगली घेतलेली दिसत आहे. आपणचं शिवसेना असल्याचं सांगण्यासाठी आणि लोकांच्या मनात आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी एकनाथ
शिंदेंचा गट दसऱ्याच्या निमित्त मेळावा घेणार आहे. या मेळाव्यावरून शिवतीर्थचे मैदान कोणाला मिळेल यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत जोरात वाद पेटला होता. परंतु बीकेसीचं मैदान शिंदे गटाला देण्यात आले तर शिवतीर्थचे मैदाने हे उद्धव ठाकरेंना मिळाले आहे. उद्याच्या मेळाव्यात एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप होणार यात शंका नाही. शिवसेनेते फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापित केली. यावरुन उद्धव ठाकरेंच्या मनात असलेला राग या मेळाव्यातून बाहेर येणार आहे. त्यांच्या क्रोधाच्या आगेत सरकारमधील नेते होरपळणार आहेत, याचीच काळजी घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणांवर लगाम घालण्याचा प्रयत्न आज केला आहे.
अधिक वाचा : सोन्याचे दागिने घातल्यानं नाराज होईल लक्ष्मी माता
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या परिस्थितीत काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल. दरम्यान, कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते. पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसून ते नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावरही टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चित्ते भारतात कोठून आणले आहेत, याबद्दलची माहिती नाही. त्यांनी दुसऱ्याच ठिकाणचे नाव सांगितले आहेत. पहिलं त्यांनी माहिती घ्यावी की कोठून चित्ते आणले आहेत. नाना पटोले चुकीची वक्तव्य करत असतात, असेही फडणवीस म्हणाले. नाना पटोले हे चर्चेत राहण्यासाठी अशी विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत. काहीतरी उलट सुलट बोललं की दिवसभर चालते.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आणलेल्या चित्त्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडं लम्पी आजाराचा प्रादुर्भावही वाढत आहे. दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. लम्पी रोग नायजेरिया मधून आला आहे. नरेंद्र मोदींनी वाढदिवशी आणलेला चित्ताही नायजेरिया मधून आणला आहे. चित्त्यावरील ठिपके आणि लम्पी मधील ठिपके सारखे आहेत. हा एक कट असून विदेशातील आजार देशात आणला आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातला कट असल्याचे पटोले म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.