New Rules For Home Isolation or Home Quarantine : वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात 'या' नियमांनुसार व्हावे लागेल होम क्वारंटाइन!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 07, 2022 | 16:58 IST

Home quarantine has to be done according to 'these' rules in case of increasing corona and Omicron Crisis : मुंबईतले कोरोना संकट वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने होम क्वारंटाइनबाबतचे नियम नव्याने जाहीर केले आहेत.

Home quarantine has to be done according to 'these' rules in case of increasing corona and Omicron Crisis
वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात 'या' नियमांनुसार व्हावे लागेल होम क्वारंटाइन!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात 'या' नियमांनुसार व्हावे लागेल होम क्वारंटाइन!
 • मुंबईत गुरुवारी २० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण
 • मुंबईत ७९ हजार २६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Home quarantine has to be done according to 'these' rules in case of increasing corona and Omicron Crisis : मुंबई : मुंबईतले कोरोना संकट वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने होम क्वारंटाइनबाबतचे नियम नव्याने जाहीर केले आहेत. 

मुंबईत गुरुवारी २० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईतले कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या गुरुवार ६ जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार मुंबईत ७९ हजार २६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीत ८ लाख ५१ हजार ७५९ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ७ लाख ५३ हजार ५३४ बरे झाले. कोरोनामुळे मुंबईत १६ हजार ३८८ मृत्यूची नोंद झाली. तसेच इतर कारणाने मुंबईत २ हजार ५७७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेने होम क्वारंटाइनबाबतचे नियम नव्याने जाहीर केले आहेत.

 1. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल पण कोणतेही लक्षण आढळत नसेल अथवा सौम्य लक्षणे असतील आणि श्वास घेण्यास त्रास होत नसेल, ताप नसेल, ऑक्सीजन पातळी सामान्य (नॉर्मल) असेल तर होम क्वारंटाइन राहता येईल. तसेच संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाइन राहता येईल.
 2. साठ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना तसेच मधुमेह (डायबेटिक), रक्तदाब (ब्लडप्रेशर), हायपर टेन्शन, हृदयविकार, किडनीचा विकार यापैकी किमान एक आजार असलेल्या साठ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना डॉक्टरांच्या परवानगीने होम क्वारंटाइन राहता येईल.
 3. रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णाला तपासल्यानंतर डॉक्टरांनी परवानगी दिल्यास होम क्वारंटाइन राहता येईल.
 4. गरोदर महिला जिच्या बाळंतपणाची तारीख दोन आठवड्यांवर आली आहे त्यांना होम क्वारंटाइन राहण्याची परवानगी नाही.
 5. होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीला घरातील एका स्वतंत्र खोलीत क्वारंटाइन व्हायचे आहे.
 6. होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीसोबत घरातील सदस्यांनी कोणतीही वस्तू शेअर करू नये. तसेच रुग्णाने इतरांच्या वस्तू वापरू नये.
 7. डॉक्टरांच्या सूचनेनुसार नियमितपणे रुग्णाने स्वतःच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सीजन पातळी तपासून त्याची नोंद ठेवावी आणि ही माहिती डॉक्टरांना आणि कोरोनाशी संबंधित नियंत्रण कक्षाकडून विचारपूस होईल तेव्हा द्यावी.
 8. कोरोना रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे तसेच होम क्वारंटाइन असताना स्वतःची आणि स्वतःच्या खोलीची स्वच्छता स्वतःच करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी