Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; कारचा चक्काचूर 5 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 18, 2022 | 08:48 IST

अपघात घडल्यानंतर महामार्ग पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. देवदूत, आय आर बी, बोरघाट पोलीस व इतर यंत्रणांनी  अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या महामार्गात अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु याचा काही परिणाम महामार्गावर होताना दिसत नाहीये.

Terrible accident on Mumbai-Pune Expressway, 5 people died
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात,5 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी 24 तास वाहनांची तपासणी करण्यासाचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले होते.
  • अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या कारमधून 7 जण प्रवास करत होते.
  • या एक्स्प्रेस वेवर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

Raigad Car Accident News: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) अपघातांचे सत्र सुरूच आहे.  गुरुवारी मध्यरात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खापोली पोलीस ठाण्याच्या (Khapoli Police Station) हद्दीत ईरटीका कारचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे ,तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. बोरघाटात (Borghat) झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या कारमधून 7 जण प्रवास करत होते. प्रशासनाकडून या  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात (Accident) रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेकांचा अद्यापही बळी जात आहे.  (Horrible midnight accident on Mumbai-Pune Expressway; 5 people died on the spot )

अधिक वाचा  : वजन कमी करताना या 5 चुका फिरवतात मेहनतीवर पाणी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ईरटीका कार पुढील वाहनाला धडकल्याने हा भयानक अपघात  झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक होताच गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. अपघातानंतर चौघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत पावलेले प्रवाशी हे सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  :ठाण्यात छडी लागे छम छम नाटकाचा रंगला प्रयोग 

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं :

1. अब्दुल रहमान खान, 32 वर्षे, घाटकोपर
2. अनिल सुनिल सानप
3. वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी
4. राहुल कुमार पांडे, वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई
5. आशुतोष नवनाथ गांडेकर, 23वर्षे अंधेरी, मुंबई.

दरम्यान अपघात घडल्यानंतर महामार्ग पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. देवदूत, आय आर बी, बोरघाट पोलीस व इतर यंत्रणांनी  अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  या महामार्गात अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु याचा काही परिणाम महामार्गावर होताना दिसत नाहीये.

दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी 24 तास वाहनांची तपासणी करण्यासाचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले होते. परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली होती. 

कशामुळे होतायत अपघात

मुंबईकडे येणाच्या वाहनांचे घाट उतरताना  ब्रेक निकामी होऊन हे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. लेन सोडून वेगात वाहने पुढे जातात. एक्स्प्रेस वेवर काहीवेळा वाहनेही बंद पडतात. त्यामुळे पाठीमागून वेगाने येणारी वाहने थांबलेल्या वाहनांवर आदळतात आणि भीषण अपघात घडत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी