मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा ५७० किलोमीटरचा आहे. (How exactly is the Mumbai-Nagpur Samrudhi Highway?)
अधिक वाचा : Police recruitment : आता तृत्तीयपंथींच्या अंगावरही चढणार अभिमान वाढणारी खाकी वर्दी
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी आणली होती. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. या मार्गात १० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. . या मार्गात ठाणे, वर्धा, वाशीम, नाशिक, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. २६ तालुके या मार्गावर जोडले जाणार असून ३९२ गावातून महामार्ग जात आहे ७१० किमीच्या या मार्गावर तब्बल १७०० पूल आहे. ५० हून अधिक ब्रिज असणार आहेत. ५ बोगदे, २४ हून जास्त इंटरचेंजेस असल्याची माहिती आहे. या महामार्गासाठीचा एकूण खर्च ५५ हजार ३३२ कोटी इतका आहे.
अधिक वाचा : Nashik Accident : सिन्नर येथे पुन्हा भीषण अपघात; कारच्या टायरने घेतला 5 विद्यार्थ्यांचा जीव
सध्या मुंबई ते नागपूर प्रवासासाठी जवळपास १४ तासांचा वेळ लागतो. हे अंतर ८१२ किलोमीटर इतकं आहे. पण आता समृद्धी महामार्गामुळे हे अंतर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई ते नागपूर हा १४ तासांचा प्रवास जवळपास ८ तासांत पूर्ण करता येईल. समृद्धी महामार्गावर टू-व्हिलर, तीनचाकी आणि ट्रॅक्टरला परवानगी नाही. तसंच या मार्गावरुन जाताना जितका प्रवास असेल तितकाच टोल भरावा लागेल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.