How much money is left with Maharashtra government for expenditure? All the figures to be presented in the budget on this day : महाराष्ट्राचे बजेट सेशन (अर्थसंकल्पीय अधिवेशन) सोमवार 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. मराठी राजभाषा दिवसाच्या मुहुर्तावर अधिवेशनाची सुरुवात होत आहे. या अधिवेशनात गुरुवार 9 मार्च 2023 रोजी राज्याचे बजेट (राज्याचा अर्थसंकल्प) सादर होणार आहे. बजेट सेशन शुक्रवार 24 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू असतानाच गुरुवार 2 मार्च 2023 रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबाद शहराचे नाव 'धाराशिव' करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे राजकीय पडसाद अधिवेशनात उमटतील असा अंदाज व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे गट या राजकीय संघर्षाचे परिणाम पण अधिवेशनाच्या निमित्ताने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांध्ये दिसतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
बजेट सेशनची सुरुवात परंपरेनुसार राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या संयुक्त सभेपुढे राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. यानंतर पुढील कामकाज सुरू होईल.
अधिवेशन काळात पगाराच्या मुद्यावरून आंदोलन करण्याचा इशारा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या दोन्ही आंदोलनांच्या इशाऱ्याचे परिणाम अधिवेशनात उमटतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (रविवार 26 फेब्रुवारी 2023) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत मविआने अधिवेशनासाठीची त्यांची रणनिती निश्चित केली.
चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (26 फेब्रुवारी 2023) संध्याकाळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी चहापानाचे आयोजन केले होते. या चहापानावर विरोधकानी बहिष्कार टाकला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.