Sanjay Raut: मुंबई: 'कधी-कधी मी इथे मी लोकांना सांगतो की, महाराष्ट्रात (Maharashtra) विशेषत: मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) इथून गुजरातींना (Gujarati) काढून टाका आणि राजस्थानी लोकांना काढून टाका तर तुमच्याकडे काही पैसे उरणारच नाहीत. ही जी राजधानी आहे जी आर्थिक राजधानी (financial capital) म्हणून संबोधली जाते मग ती आर्थिक राजधानी राहणारच नाही.' असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. ज्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच शिवसेनेचे (Shiv sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे. (how so much chief minister shinde leaning forward delhi why did sanjay raut target eknath shinde)
'महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.. मुख्यमंत्री शिंदे.. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..' असं ट्विट करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करुन भाजप आणि राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच त्यांनी एकनाथ शिंदेंना देखील टार्गेट केलं आहे. जाणून घ्या संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले.
'सत्ता मिळवूनही ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे'
'राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीच गेले नव्हते. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसून टाकली जात आहे. शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना व ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकत आहेत. सत्ता मिळवूनही ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना किती किंमत द्यायची?' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे.. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा
'महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.. मुख्यमंत्री शिंदे.. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..' असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
'50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..'
'काय ती झाडी..
काय तो डोंगर..
काय नदी..
आणि आता...
काय हा मराठी माणूस ..
महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..' अशा बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
'मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे?'
'थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना.
की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय?' असा सवाल करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
'ऊठ मराठ्या ऊठ..'
'आता तरी..
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल..' असं ट्विट करत संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, आता संजय राऊत यांच्या या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच राज्यपालांच्या विधानबाबत ते काय भाष्य करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.