...तरी पण आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच!, विनायक मेटेंचे जाहीर सभेत वक्तव्य

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनातील भावना त्यांच्यासमोर बोलून दाखवली.

...However, Chief Minister Fadnavis is in our mind!, Vinayak Mete's statement in a public meeting
...तरी पण आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच!, विनायक मेटेंचे जाहीर सभेत वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईत विनायक मेटे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम
  • देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. तेव्हापासून काहीसे नाराज असणाऱ्या भाजपच्या नेत्यांंच्या मनातली खदखद आज शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केली. (...However, Chief Minister Fadnavis is in our mind!, Vinayak Mete's statement in a public meeting)

अधिक वाचा : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा, मुंबई आणि औरंगाबादच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मान्यवर उपस्थित होते. आमच्या मनात फक्त तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असंही विनायक मेटे म्हणाले आहेत.

अधिक वाचा : राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

या कार्यक्रमात विनायक मेटे यांनी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. मेटे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत. तुम्ही शब्द दिला होता सरकार मध्ये घेण्याचा, तो जरी पाळले नाही तरी आम्ही तुमच्या सोबत असू. तुम्ही आम्हाला न्याय द्या, पण आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत. तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खरीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी