HSC Exam Application Form Date : 12 वी च्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर; Online पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 12, 2021 | 07:55 IST

HSC Exam Application Form Date :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (Higher Secondary Certificate Examination) म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे.

HSC Exam Announcement of application dates for 12th exam
12 वी च्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन
  • नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत.

HSC Exam Application Form Date : मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (Higher Secondary Certificate Examination) म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी केले आहे.

नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार अर्ज 

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत. 

व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वेगळ्या तारखा जाहीर

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर,

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार 28 डिसेंबर 2021 रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी कळवलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी