HSC Board Exam 2023 Info in Marathi : महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board of Education)बारावीच्या (HSC) परीक्षा (Examination) सुरू झाल्या आहेत. मात्र बोर्ड प्रश्नपत्रिकेतचं घोळ घालत आहे. प्रश्नाऐवजी उत्तरचं प्रश्नपत्रिकेत देत असल्याने विद्यार्थ्यांना उत्तर काय लिहावे हे कळत नाहिये. दरम्यान, इंग्रजी (English) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचे समोर आल्यानंतर आता पुन्हा हिंदी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार करण्यात येत आहे. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायांना चुकीचे आकडे देण्यात आल्याने नेमकं उत्तर काय लिहावे, असा प्रश्नच विद्यार्थ्यांना पडला होता.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे मंगळवारीच उघडकीस आले होते. आज हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे उपप्रश्न क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले आहेत. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे, तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत आहेत. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करणार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.