HSC Board Exam 2023 update in marathi : बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, उद्यापासून परीक्षा सुरू, परीक्षा सेंटरवर 144 कलम लागू 

HSC Board Exam 2023 update in marathi : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

hsc exam board of secondary and higher secondary education 12th examination will start from 21 february read in marathi
बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, उद्यापासून परीक्षा  
थोडं पण कामाचं
 • बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.
 • कोव्हिडनंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे.
 • विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परिरक्षक कार्यालयात (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती.

HSC Board Exam 2023 update in marathi : बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. कोव्हिडनंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परिरक्षक कार्यालयात (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती. निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेची सुविधा रद्द करण्यात आली आहे. सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसणे अशा काही बदलांसह विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. (hsc exam board of secondary and higher secondary education 12th examination will start from 21 february read in marathi)

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यंदा निर्धारीत वेळेपूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेची सुविधा रद्द करण्यात आली. यासह सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. कोरोनानंतर प्रत्यक्ष तासिका दोन वर्षे झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव कमी झाला. हे लक्षात घेऊन औरंगाबाद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात तीन सराव परीक्षा घेण्यात आल्या. शाळा, महाविद्यालय स्तरावरही सराव परीक्षांवर अधिक भर देण्यात आला. इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सराव परीक्षांचा प्रयोग राबविण्यात आला. यंदा शिक्षण मंडळासह कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळासह महसूल, पोलिस विभागासह इतर विभागांचीही नजर असणार आहे.

जीपीएस ट्रॅकिंग

परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दहा मिनिटांचा वेळ अधिक

यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिल्या जात होते. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.


महत्त्वाचे बदल

 1. प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत म्हणजेच ११ व ३ वाजता
 2. निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अधिक कालावधी.
 3. सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाही
 4. परीक्षा कक्षात उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून दाखवणार.
 5. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरणाचे ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’
 6. परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही
 7. परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश
 8. शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या वेळी झडती घेणार
 9. परीक्षा केंद्रांवर बैठे पथके
 10. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा, तर महसूल विभागाची १० पथके
 11. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, ग्रामविकास विभागाची पथके

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी