HSC SSC Exam Guidelines : बारावी आणि दहावीची परीक्षा या दिवसापासून होणार सुरू, परीक्षेसाठी हे आहेत महत्त्वाचे नियम

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 08, 2023 | 14:49 IST

HSC Exam scheduled, SSC Exam scheduled, important guidelines for HSC and SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

HSC Exam scheduled, SSC Exam scheduled
बारावी आणि दहावीची परीक्षा या दिवसापासून होणार सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बारावी आणि दहावीची परीक्षा या दिवसापासून होणार सुरू
  • परीक्षेसाठी हे आहेत महत्त्वाचे नियम
  • परीक्षा सुरू होण्याची वेळ

HSC Exam scheduled, SSC Exam scheduled, important guidelines for HSC and SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात बारावीची परीक्षा (HSC Exam) मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा (SSC Exam) गुरुवार 2 मार्च 2023 ते शनिवार 25 मार्च 2023 या काळात होणार आहे. परीक्षा काळात सकाळच्या सत्रातील पेपर सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी तर दुपारच्या सत्रातील पेपर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेत हजर राहायचे आहे. संबंधित सत्रातील परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. 

बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना 

इंधन खर्चात होणार बचत, बाजारात येणार नवे Petrol
Amrit Udyan मध्ये हे बघाल तर चक्रावून जाल

परीक्षेच्यावेळी गैरप्रकार केल्यास सबंधितांवर कारवाई होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. प्रत्येक पेपरसाठी परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यांनी ओळखपत्र आणि प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. कोविड काळातील सवलती आता रद्द करण्यात आल्या आहेत. 

परीक्षा द्यायच्यावेळी विद्यार्थ्यांना सोबत मोबाइल बाळगण्यास आणि कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. स्वतःची उत्तरे इतरांना दाखवून अथवा सांगून अप्रत्यक्षपणे कॉपी करण्यासाठी मदत करणे अथवा दुसऱ्या व्यक्तीची उत्तरे जाणून घेऊन अथवा बघून त्यांची कॉपी करणे यावर बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी