HSC Exams 2023 English Paper: 12वीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी, विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार

HSC exam English Paper bonus marks: बारावीच्या इंग्रजीच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
  • इंग्रजीच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार

Maharashtra HSC Exams 2023: "फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे. 21 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. मात्र, या इंग्रजीच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी असल्याचं समोर आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याची मागणी करण्यात येत होती. आता या प्रकऱणी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा : ट्रेनचं वजन किती असतं रे भाऊ?

शिक्षण मंडळाने म्हटलं, प्रश्नपत्रिकेतील चुकलेले प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर या विद्यार्थ्यांना सहा गुण बोनस म्हणून मिळणार आहेत. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी संदर्भात तज्ज्ञांची बैठक झाली आणि त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात आला. यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात बोर्डाने पत्रक काढत म्हटलं, "फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे. दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी 'इंग्रजी' विषयाची परीक्षा झाली आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत दि. 03.03.2023 रोजी आयोजित करण्यात आली. सदर इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी / चुका आढळून आल्या असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरुन निदर्शनास येते. सदर अहवालानुसार त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना पुढील परिस्थितीमध्ये देण्यात येतील.

1) Poetry Section-2 / Poetry / Secion-2 असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास,

2) Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास, 

3) त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक (A-3, A-4, A-5) असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, 

उपरोक्त तीनपैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केले असल्यास, विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे 02 या प्रमाणे एकूण 06 (सहा) गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

नेमकं काय घडलं होतं?

21 फेब्रुवारी परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि या पहिल्या पेपरमध्येच घोळ झाल्याचं दिसून आलं आहे. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.

हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

इंग्रजी विषयात्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येवून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असं बोर्डाने म्हटलं होतं आणि आता त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी