HSC Result 2022 MSBSHSE 12th Result: बारावी (HSC) बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर 

Maharashtra HSC Result 2022 MSBSHSE 12th Result:   महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MHBHSE) आज ८ जूनच्या रोजी 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतील.

HSC Result 2022 MSBSHSE 12th Maharashtra board Result to be declared today at 1pm check www.maharesult.nic.in
बारावी (HSC) बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार 
  • ही परीक्षा 4 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
  • या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

Maharashtra HSC Result 2022, MSBSHSE 12th Result, www.maharesult.nic.in :  महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MSBSHSE)मंडळाचा आज दुपारी १ वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे.  या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र राज्य मंडळाने प्रतींचे मूल्यांकन पूर्ण केले असून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका साइटवर अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. (HSC Result 2022 MSBSHSE 12th Maharashtra board Result to be declared today at 1pm check www.maharesult.nic.in)

अधिक वाचा : MSBSHSE HSC Result 2022 LIVE: बारावीच्या निकालाच्या लाइव्ह अपटेड्स 

बारावी बोर्ड सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सचा निकाल एकत्र जाहीर करणार आहे.  बोर्डाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी. विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतील.

यावेळी महाराष्ट्र बोर्डाने 4 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत 12वी बोर्डाची परीक्षा घेतली होती, ज्यामध्ये सुमारे 14.72 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. पेपर संपल्यानंतर एक ते दोन आठवड्यांच्या दरम्यान पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र मध्येच शिक्षक संपावर गेल्याने उत्तर पत्रिका तपासणीचे काम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे निकालाला विलंब होतो की काय असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तसेच भविष्यातील अॅडमिशन लक्षात घेता १० जून पूर्वी निकाल लावणे बंधनकारक होते. तसा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.  

 बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे त्यांचा निकाल तपासावा. 

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2022, कसा तपासायचा

  1. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
  2. होमपेजवर, MSBSHSE 10वी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  4. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचण्यांच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी