HSC Result 2022:  बारावीत मिळालेल्या गुणांबद्दल शंका? लगेच होणार रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशन, वाचा सविस्तर

जर तुम्ही आपला निकाल पाहिला असेल आणि तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्द्ल शंका असेल तर तुम्ही रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरू शकता. त्यासाठी काय करावे लागेल जाणून घेऊया सविस्तर.

hsc result 2022
बारावीचा निकाल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जर तुम्ही आपला निकाल पाहिला असेल
  • आणि तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्द्ल शंका असेल तर तुम्ही रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरू शकता.
  • त्यासाठी काय करावे लागेल जाणून घेऊया सविस्तर.

HSC Result 2022 Live Update: मुंबई :  नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात कोकणाने बाजी मारली असून मुंबईचा सर्वात कमी निकाल लागला आहे. मंडळाच्या अधिकृत बेबसाईटसह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. या निकालात विद्यार्थ्यांना विषयनिहाय किती गुण मिळाले आहेत याचीही माहिती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रिंट काढण्याची सुविधा पुरण्यात आली आहे. जर तुम्ही आपला निकाल पाहिला असेल आणि तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्द्ल शंका असेल तर तुम्ही रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरू शकता. त्यासाठी काय करावे लागेल जाणून घेऊया सविस्तर

.
ज्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आता जेईई आणि नीटची परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी तसेच रिव्हॅल्युशन म्हणजेच पुर्नमूल्यांकनाची फोटोकॉपी लगेच मिळणार आहे, यासाठी शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळाना सूचना जारी केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकर करून विद्यार्थ्यांना प्राधान्याने मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून, ऑनलाईन शुल्क भरावे लगणार आहे. 

असा करा अर्ज

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुर्नमूल्यांकनासाठी  http://verification.mh-hsc.ac.in  या वेबसाईटवर भेट द्यावी. या वेबसाईटवर सर्व माहिती अटी आणि शर्ती एकदा वाचून घ्या. तसेच या अर्जासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीय किंवा नेट बँकिंग पद्धतीने शुल्क करता येणार आहे. 


गुण पडताळणीसाठी मुदत

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी मुदतही देण्यात आली आहे. १० जून २०२२ ते २० जून २०२०२ पर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित अहए. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ५० रुपये शुल्क आकरण्यात येईल.  मार्च - एप्रिल २०२२ च्या परिक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका इमेलेद्वारे, ऑनलाई, घरपोहोच असे पर्याय देण्यात आले आहे. तसेच उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क असणार आहे आणि हे शुल्क विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरत येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी