Hsc results 2022: मुंबई : दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे तशी विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक वाढत आहे. कोरोना काळात पहिल्यांदा दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी केली होती. परंतु बोर्डाने ही मागणी अमान्य करत परीक्षा ऑफलाईन घेतली. सर्व लेक्चर ऑनलाईन झाले होते परंतु परीक्षा ही ऑफलाईनच झाली होती. आता या परीक्षेच निकाल लवकरच लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप हातात घेऊन बसता. बर्याच वेळेला ही निकाल पाहताना निकलाची वेबसाईट हँग होते. परंतु तुम्ही बोर्डाच्या निकालाशिवाय दुसर्या ठिकाणीही आपला निकाल पाहू शकतात. त्यात डिजिलॉकर या ऍपचा समावेश आहे.
अधिक वाचा : बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता
SMS वरही मिळवा निकाल
आता व्हॉट्सऍप आल्याने SMS चा वापर बहुतांश ओटीपीसाठीच केला जातो. पण एका SMS वरही तुमचा निकाल तुम्हाला मिळू शकतो. इतकेच नाही ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आणि जे लोक साधा मोबाईल वापरतात त्यांनाही या सुविधेचा फायदा होणार आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कंपोज एसएमएस करा त्यात MHHS टाईप करून पुढे आपला रोल नंबर टाका. आणि हा एसएमएस ५७७६६ या नंबरवर पाठवा. थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल तुमचा निकाल कळेल.
अधिक वाचा : पंचायत 2 मधील रिंकीचे काही खास फोटो
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.