Scholarship : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्कासाठी मिळणार शिष्यवृत्ती, या वेबसाईटवर करा अर्ज

शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे. तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.

scholarship
शिष्यवृत्ती  |  फोटो सौजन्य: BCCL

Scholarship : मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी  पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in) दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे.  या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे. तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी