ST Employees Hunger Strike : पगारासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात, तातडीने मागण्या मान्य करा अन्यथा..

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 27, 2021 | 16:57 IST

ST Employees Hunger Strike : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.

hunger strike of ST employees for various demands including salary
पगारासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई : ST Employees Hunger Strike : राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं अजून मोठं गिफ्ट हवं होतं. यामुळे आज बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, मनमाड, नागपूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने  (State Government) तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाही तर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी सर्व बस बंद देखील राहण्याची शक्यता असून याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल. असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान,  पाच टक्के महागाई भत्तात वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटीची घोषणा एसटी महामंडळाने केल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा केले जात आहे. यावेळी जर एसटी सेवा कोलमडल्यास उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रकच एसटी महामंडळाने काढण्यात आले होते, तरी आंदोलनाला सुरूवात झाली आहे. 

असे असेल आंदोलन -

समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे तीन टप्प्यात आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दिवाळीच्या तोंडावर आजपासून उपोषण सुरू करण्यात येत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी