नवी मुंबई : लग्नानंतर (marriage) अनेक महिलांना सासरच्या (laws- family) त्रासाला सामोरे जावे लागते. रंग रुपावरून, मुल होत नाही म्हणून अनेक विवाहितांचा छळ होत असतो. त्यात जर सासरच्यांना वंशाचा दिवा हवा असेल तर ते हा छळ अधिक तीव्र होत असतो. मुलगा हवा म्हणून सासू आणि नवऱ्याने हद्द पार केली. मुलगा हवा यासाठी विवाहितेला भोंदुबाबा (bhondu baba)आणि नवऱ्याच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना मुंबईमधील (mumbai) नेरुळ ( nerul) परिसरात घडली आहे. पीडित विवाहितेने ( married)पोलिसात (police) या बाबतची तक्रार दाखल केली आहे. (husband forced the wife to have physical relations with his friend for boy child )
अधिक वाचा : आराध्या बच्चन पाहिलं तर म्हणाल, माय तशी लेक
नेरुळमधील 30 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात छळवणुकीसह विनयभंग, बलात्कार, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासरे, चुलतसासरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : या स्टार किड्सला नाही आवडत अभिनय क्षेत्र
तक्रारीनुसार, नेरूळ पूर्व भागात राहणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा 2017 मध्ये विवाह झाला होता. मात्र तिला वर्षभरानंतरदेखील मूल होत नसल्याने तिच्या पतीने चार वेळा कृत्रिमरीत्या गर्भधारणा (आयव्हीएफ) करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्नसुद्धा यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे तिच्या पती, सासरकडील मंडळींनी तिला मूल व्हावे यासाठी डोंबिवलीतील एका भोंदूबाबाशी जबरदस्तीने लगट करण्यास भाग पाडले. त्यानंतर भोंदूबाबाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या पतीने मित्राशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.
अधिक वाचा : Daily Horoscope: आजचा दिवस काहींसाठी असेल व्यस्त तर काहींसाठी गुंतवणुकीचा
विकृतपणाचा कळस म्हणजे मित्राचे आणि त्याच्या पत्नीचे नग्न फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर पत्नीला ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्याच मित्राशी अनेकवेळा शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र विवाहितेने शरीरसंबंध ठवण्यास विरोध केल्यास तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. तसेच तिने घटस्फोट द्यावा, यासाठी ऑक्टोबर महिन्यात तिला मारहाण करून घरातून बाहेर काढले, अशी तक्रार पीडितेने नेरूळ पोलिसांत दिली आहे.
सासरच्या लोकांनी विवाहितेच्या घरच्यांकडून लग्नावेळी हुंडा देखील घेतला होता. सासरकडील मंडळींनी 21 लाखांचा हुंडा घेतला होता. 17 लाख 45 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच 3 लाख 75 हजार रुपयांचे दागिने घेतल्याची तक्रारही पीडितेने पोलिसांकडे केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.