Crime: पतीची हत्या... प्रेयसी मामी आणि प्रियकर भाच्याला अटक

Murder case: एका मामी आणि भाच्याच्या प्रेमसंबंधात अडथळा असलेल्या महिलेने आपल्या पतीलाच (Husband) संपवल्याची (Murder) धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) साकीनाकामध्ये घडली आहे.

husband murder beloved aunt and lover nephew arrested case registered at sakinaka police station
Crime: पतीची हत्या... प्रेयसी मामी आणि प्रियकर भाच्याला अटक 
थोडं पण कामाचं
  • प्रियकर भाचा आणि प्रेयसी मामीने अनैतिक संबंधापायी उचललं टोकाचं पाऊल
  • महिलेने भाच्यासोबत असलेल्या प्रेमापायी पतीची केली हत्या
  • मामी आणि भाच्याला साकीनाका पोलिसांनी केली अटक

Mumbai Crime: मुंबई: मुंबईतील सकिनाका (Sakinaka) परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder Case) करण्यात आल्याचं धक्कदायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मृत व्यक्तीचं नाव नसीम शेख असं असल्याचं समजतं आहे. या हत्या प्रकरणात मृत नसीमची पत्नी रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना अटक (arrest) करण्यात आली आहे. (husband murder beloved aunt and lover nephew arrested case registered at sakinaka police station)

धक्कादायक बाब म्हणजे मामी रुबिना शेख हिच्यासोबत आपला भाचा मोहम्मद सैफ याचे प्रेमसंबंध होते. याच गोष्टीचा संशय नसीमला आल्यानंतर त्याने वारंवार पत्नी रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने नसीम याची गळा दाबून हत्या केली.

अधिक वाचा: Mumbai Crime: मुंबईतील घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला नवऱ्याचा मृतदेह तर पत्नी...

याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रारी दाखल केली. सून रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तीक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवला. असं या तक्रारीत म्हटलं आहे. 

या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी तात्काळ दोन्ही आरोपींचा शोध घेतला. 

अधिक वाचा: Student Suicide : विद्यार्थिनीने केली 'नीट' परीक्षेच्या एक दिवस आधीच आत्महत्या, कुटुंबीय म्हणाले...

तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून शोध घेऊन आरोपी रूबिना व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. रूबिना व सैफ यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारणा केली असताना तिने व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारूकी याच्याशी संगनमत करून नसीम शेख याचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले.

दोन्हीही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हत्येच्या गुन्ह्यात त्यांना  अटक करण्यात आली आहे. नसीम शेख हा रूबिनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ करत असल्याने याच छळाला कंटाळून आपण हा गुन्हा केला असल्याचे रुबिनाने आपल्या जबानीत सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी