Uddhav Thackeray: 'मला संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक', उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 01, 2022 | 16:59 IST

Uddhav Thackeray criticism of BJP: 'मला संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राऊतांचं कौतुक केलं. पण याच वेळी त्यांनी भाजपवर तुफान टीका देखील केली.

i am proud of sanjay raut he is a true shiv sainik of balasaheb uddhav thackeray criticism of bjp
'संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक'  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
  • उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
  • संजय राऊत यांची अटक भाजपने द्वेषातून केली असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (१ ऑगस्ट) संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे संजय राऊत यांचं त्यांनी कौतुकही केलं आहे. 'संजय राऊत याचा मला अभिमान वाटतो. तो बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि तो शेवटपर्यंत झुकला नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळ्या घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं. (i am proud of sanjay raut he is a true shiv sainik of balasaheb uddhav thackeray criticism of bjp)

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले: 

'सध्या सुरु असलेलं राजकारण घृणास्पद' 

'भाजपसोबत लढणारा आज कुठलाच राष्ट्रीय स्तरावरील पक्ष नाही. जे संपले नाही ते संपतील फक्त आपण टिकणार. हे जे काही त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंवा हुकूमशाहीकडे नेणारे वक्तव्य आहे.'

अधिक वाचा: Kirit Somaiya : शिवसेना पक्ष लवकरच संपणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

'आता सध्या जे काही राजकारण सुरु आहे ते अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले राजकारणात हे समजू शकतो. पण आपले जे गुलाम होतील ते काही काळ आपले. त्यांचं काम संपल्यानंतर नवीन गुलाम येतील आणि हे जातील. हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी दिशा त्यांनी ठरवलेली आहे. संजय राऊतांबाबत मला नक्कीच अभिमान आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण संजय राऊतांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे.

'संजय राऊतांबाबत मला नक्कीच अभिमान आहे'

'दिवस हे नेहमीच सारखे नसतात. दिवस हे फिरतात मग दिवस एकदा फिरले तर तुमचं काय होईल याचा सुद्धा विचार नड्डांनी आणि भाजपने करणं गरजेचं आहे.' 

'संजय राऊतांबाबत मला नक्कीच अभिमान आहे. आत्ताच मी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलोय. काय गुन्हा काय आहे संजयचा? पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भिड आहे आणि जे पटत नाही ते बोलतोय. ज्या पद्धतीने त्याला अटक केली आहे.. त्याचं एक वाक्य चांगलं आहे की, मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही. तोही शरण जाऊ शकला असता. जे-जे तिकडे शरण गेले आहेत मी असं म्हणेल की हमाममध्ये गेले आहेत. आंघोळीला गेले आहेत. जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे तोपर्यंत आमच्यावर ते टीका करु शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थिती त्यांना जाणीव होईल.' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: Sunil Raut: संजय राऊतांना अटक, दुसऱ्या राऊतांनी सुरू ठेवला पत्रकार परिषदेचा सिलसिला

'मुख्यमंत्रिपदाची हवा कधीही माझ्या डोक्यात गेली नाही'

'राजकारण आता घृणास्पद होत चाललं आहे. घृणा वाटायला लागली आहे या राजकारण्यांची. एक दिलदारपणा असला पाहिजे. तुम्हाला पक्ष संपवायचा असेल तर तुम्ही जनतेसमोर जा.'

अधिक वाचा: Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, कोर्टाचा निर्णय

'मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की, मी अडीच वर्ष मुख्यमंत्री नक्की होतो. पण त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नव्हती. ती जाऊ दिली नव्हती. याचं कारण शिवसेनाप्रमुख जे सांगायचे की, पद असेल, सत्ता असेल येते-जाते पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा. मी लोकांशी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे. आज मात्र ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना सांगू इच्छितो की, निर्घृणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी चांगलाच असतो असं नाही.' असा इशाराच यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

'संजय राऊत बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक'

'प्रादेशिक अस्मिता चिडून टाकायची. हिंदूमध्ये फूट पाडायची आणि मराठी-अमराठी राजकारण करायचं असं हे भाजपचं राजकारण हे अत्यंत भेसूरपणाचं आहे. जे जनतेसमोर आलं आहे. मला संजय राऊतांवर अभिमान आहे. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक.. हा खरंच झुकला नाही. जे झुकणारे होते ते हमाममध्ये गेले. झुकणारे कधी शिवसैनिक होऊ शकत नाही.'  

'मी पुन्हा एकदा सांगतो की, संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत. माझा चांगला मित्र आहे म्हणूनच मी त्याला अरे-तुरे करतो. तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि त्याने या दंडेलशाहीविरुद्ध न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच टाकली आहे.' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी