VidhanSabha: 'तर मी एवढा मोठा, करेक्ट कार्यक्रम केलाच नसता', मुख्यमंत्री शिंदेंचा भर सभागृहात शिवसेनेला टोला

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 22, 2022 | 16:40 IST

Shiv Sena vs Eknath Shinde: मी सक्षम नसतो तर एवढा मोठा, करेक्ट कार्यक्रम केला नसता. असा टोमण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना शिवसेनेला लगावला आहे.

i would not have done such a big and correct program if i was not capable cm shinde criticized shiv sena in assembly
तर मी एवढा मोठा, करेक्ट कार्यक्रम केलाच नसता: मुख्यमंत्री (सौजन्य: Maharashtra Assembly Live)  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांची विधानसभेत जोरदार फटकेबाजी
  • थेट नगराध्यक्ष निवडून येण्याच्या विधेयकावर मुख्यमंत्र्यांचं जोरदार भाषण
  • शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी लगावले टोले

Eknath Shinde: मुंबई: विधानसभेच्या (Vidhansabha) पावसाळी अधिवेशनात नगरपरिषद, नगरपंचायतीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून यावा यासंबंधीची विधेयक आज (२२ ऑगस्ट) विधानसभेत संमत करण्यात आले. मात्र, या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. ज्यावर सगळ्यात शेवटी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांना अनेक कोपरखळ्या मारल्या. 'आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही.' असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांना लगावला. (i would not have done such a big and correct program if i was not capable cm shinde criticized shiv sena in assembly) 

'आम्ही जनतेचं ऐकतो आहे. जे जनता बोलेल तेच आम्ही करणार. भास्करराव म्हणाले की, तुम्ही स्वत:च्या विचारांनी काम केलं पाहिजे. त्यांना मी सांगतो की, काही काळजी करु नका. मी सक्षम आहे. देवेंद्रजी और मैं हू साथ-साथ.. मेरा भी नाम है एकनाथ.'

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का;'हा' बडा नेता शिंदे गटात सहभागी

'आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही. जयंतराव पण त्यादिवशी भेटले मला. ते म्हणाले. की, अहो असं कसं झालं. त्यामुळे यामध्ये कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, रिमोट चालवला हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

पाहा एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले:

आतापर्यंत अनेक निर्णय आपण बदलेले आहेत. जेव्हा एखादा निर्णय होतो तेव्हा त्याचा धोरणात्मक विचार करुन फायदे-तोटे लक्षात घेतले जातात. अनेक निर्णय आपण याआधीही बदलेले आहेत. आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये आपण अनेक निर्णय घेतले आणि बदलले आहेत. पूर्वीच्या शिवसेना-भाजप युतीने घेतलेले अनेक निर्णय आपण बदलले होते. 

आतापर्यंतचे जे थेट नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. अडीच वर्ष त्यांना दिली जातील. जसे आम्ही पुढचे अडीच वर्ष स्थिरस्थावर बसलेलो आहोत. तशी अडीच वर्ष नगराध्यक्ष त्याला मिळतील. 

जर आपल्या पारदर्शकता आणायचा असेल जो कोणी निवडून येतो तो कारभार करु शकतो. 

अधिक वाचा: "आता CM घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही"

दादा मघाशी म्हणाले की, मुख्यमंत्री पण थेट निवडा. आता बघा.. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी घटना लिहली आहे. त्या घटनेच्या तरतुदी प्रमाणे आपण मुख्यमंत्री निवडतो. जे नगराध्यक्ष आहेत ते राज्यांना अधिकार दिलेले आहेत. मग तुम्हाला असं सुचवायचं आहे का? घटना बदला.. 

अजितदादा म्हणाले का बदला म्हणून?.. नाही ना.. त्यांचा मुद्दा तसा नव्हता. यात आपण घटनेप्रमाणे कामकाज करतो आहोत. अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे. जो चुकीचा निर्णय घेईल शासन त्याच्यावर कडक कारवाई करेल. आपण सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच हे विधेयक आणलं आहे. 

खूप लोकं म्हणाले की, कोणी बंदूक ठेवून.. कोणाच्या आग्रहाखातर मी निर्णय घेतोय. असं काही नाही.. भास्कर जाधव म्हणाले की, आता ग्रामपंचायतचे सरपंच देखील थेट जनतेतून येतील. आता ९ हजार ग्रामपंचायती आहेत.. ज्यांचं म्हणणं आहे की, थेट सरपंच निवडा जनतेतून. ही त्यांची मागणी आहे. 

अधिक वाचा: सेनेचा ४१ वा आमदार फुटणार अन् शिंदे गटात सहभागी होणार?

आम्ही जनतेचं ऐकतो आहे. जे जनता बोलेल तेच आम्ही करणार. भास्करराव म्हणाले की, तुम्ही स्वत:च्या विचारांनी काम केलं पाहिजे. त्यांना मी सांगतो की, काही काळजी करु नका. मी सक्षम आहे. देवेंद्रजी और मैं हू साथ-साथ.. मेरा भी नाम है एकनाथ. 

आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही. जयंतराव पण त्यादिवशी भेटले मला. ते म्हणाले. की, अहो असं कसं झालं. त्यामुळे यामध्ये कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, रिमोट चालवला हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे.

अधिक वाचा: शिंदे-फडणवीस आणि पवारांसमोर दोन माईक का?: आशिष शेलार

आम्ही बहुमताच्या जोरावर कोणतंही काम करणार नाही. आम्ही दोघांनीही ठरवलं आहे. पण एक आहे. काही लोकं ते बाहेर तिकडे रोज एकच शब्द वापरतात. दुसरा मुद्दाच नाहीए. दोनच शब्द नाहीत. परवा ते काही तरी ताट, वाटी चलो गुवाहटी. 

धनंजय मुंडेपण होते तिकडे. एवढं जोरात बोलत होते की, ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत. एकदम.. म्हणजे असं बोलत होते की, बेंबीच्या देठापासून ओरडून. तुमचा घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलत होतात. आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे. आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. त्यामुळे हे झालं.. कसंय बघा.. पण परत-परत दाखवता येणार नाही. असं जोरदार भाषण एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी