Sanjay Raut : आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 12, 2022 | 13:48 IST

राज्यसभेच्या (Rajya Sabha) 6 जागांचा फायनल निकाल आला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची राजकीय खेळी यशस्वी ठरल्यानं शिवसेनेला मोठा झटका लागल्याचं म्हटलं जात आहे.

 Sanjay Raut holds on to ED for Fadnavis' vote
फडणवीसांच्या मतासाठी संजय राऊतांना हवा ईडीवर होल्ड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव
  • आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. - राऊत

Sanjay Raut On BJP : मुंबई :  राज्यसभेच्या (Rajya Sabha) 6 जागांचा फायनल निकाल आला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची राजकीय खेळी यशस्वी ठरल्यानं शिवसेनेला मोठा झटका लागल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना प्रश्न करण्यात आला असता राऊतांनी सांगितलं केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्यात आली.  आमच्या हातातही जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. 
आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे आमच्या हातात केवळ ED द्या, मग बघा असं राऊत म्हणाले. दरम्यान पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा पुढाकार
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याचे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) म्हटले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फुटीरतावादी शक्तींविरुद्ध मजबूत आणि प्रभावी विरोध करण्यासाठी त्यांनी 15 जून रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि इतर म्हणूनही काम केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह 22 नेत्यांना पत्र लिहिले. या बैठकीला शिवसेनेकडून प्रतिनिधी बैठकीला हजर राहणार असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी