'मी बोलायला लागलो तर भूकंप होईल', रामदास कदमांना 'नेमकं' काय माहितीए?

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 19, 2022 | 21:03 IST

Ramdas Kadam attack on Uddhav Thacekray: माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतृत्वावर तुफान टीका केली आहे. याचवेळी त्यांनी असाही दावा केला आहे की, जर काही गोष्टी त्यांनी समोर आणल्या तर राजकीय भूकंप होईल.

if i start talking there will be an political earthquake what does ramdas kadam know exactly
'मी बोलायला लागलो तर भूकंप होईल', रामदास कदमांना 'नेमकं' काय माहितीए? 
थोडं पण कामाचं
  • माजी मंत्री रामदास कदम यांचा मोठा दावा
  • मी बोललो तर राजकीय भूकंप होईल, रामदास कदम यांचा दावा
  • रामदास कदम यांची अनिल परबांवरही टीका

मुंबई: आपल्या नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. यावेळी रामदास कदम यांनी असं वक्तव्य केलं की, 'माझ्या मनात अनेक गोष्टीत आहेत. पण आज सगळं बोलणार नाही. काही गोष्टी मी योग्य वेळेला बोलेन आणि तेव्हा भूकंप होईल भूकंप.' असं कदम यावेळी म्हणाले. 

रामदास कदम असं का म्हणाले याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रामदास कदमांना अशा कोणत्या गोष्टी माहिती आहेत की, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल? पाहा रामदास कदम हे नेमकं काय म्हणाले. 

'उद्धव साहेब तुम्हाला शरद पवार जवळचे झाले का?'

'माझी हकालपट्टी करता तुम्ही.. माझी.. हा अनिल परब.. काय योगदान त्याचं पक्षासाठी. तो जाऊन योगेशच्या सगळ्या लोकांची हकालपट्टी करतो. म्हणून वेदना होतायेत. जेवण जात नाहीए. तो दुसरा विनायक राऊत तो बोलतो की, रामदास कदमांचं खरं रुप दाखवतो.' 

अधिक वाचा: 'वर्षभरापूर्वीच शिवसेना-भाजप युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर झालेली चर्चा', शेवाळेंचा गौप्यस्फोट

'रामदास कदमने कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. थेट अंगावर गेलेला नाही. बाळासाहेबांचे सैनिक आहोत आम्ही. बेईमानी आमच्या रक्तात नाही. मी एकनाथ शिंदेंना धन्यवाद देतो त्यांनी पक्ष वाचवला. त्यांनी आमदारांना सांभाळलं. पक्षापेक्षा तुम्हाला शरद पवार जवळचे झाले का? घ्या निर्णय तुम्ही उद्धवजी.' असा खडा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.  

मी योगेशला म्हटलं जा तू एकनाथ शिंदेंसोबत.' 

'जेव्हा सगळे आमदार सोडून जात होते तेव्हा मी आमदारांशी संपर्क साधला आणि मी त्यांना विचारलं की, नेमकं असं का करतायेत. तेव्हा ते म्हणाले की, जर आम्ही नाही गेले तर आम्ही संपून जाऊ. मग मी योगेशला म्हटलं जा तू एकनाथ शिंदेंसोबत.' 

अधिक वाचा: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?

'माझ्या मनात आहे. पण आज सगळं बोलणार नाही. काही गोष्टी मी योग्य वेळेला बोलेन. तेव्हा भूकंप होईल भूकंप. आणखी माझ्याबाबतीत कोणी बोललं तर भूकंप होईल त्याला जबाबदार ते असतील. मी कडवा सैनिक आहे बाळासाहेबांचा.' असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

'उद्धव ठाकरे तुम्हाला शरद पवारांनी फसवलं'

'साहेब असते तर मला राजीनामा द्यायची गरज लागली नसती. उद्धवजी म्हणाले ना.. बाळासाहेब साधे होते.. तर बाळासाहेब साधे नव्हते. उद्धवजी साधे तुम्ही निघालात. तुम्हाला फसवलं, तुम्हाला गंडवलं शरद पवारांनी.' 

अधिक वाचा: शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, खासदाराचा गौप्यस्फोट

'बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख झालं तरी चालेल पण शरद पवारांची साथ सोडायची नाही. हे कुणाच्या हट्टापायी चाललं आहे. कोण आजूबाजूला हे लोकं आहेत. हेच तर सगळं मूळ आहे.' असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.

'उद्धवजींनी दोन पावलं मागे यायला पाहिजे'

'उद्धवजींनी दोन पावलं मागे यायला पाहिजे. प्रसंगी दोन पावलं मागे येऊन आपण आपलं घर शाबूत ठेवलं पाहिजे. गेलेल्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे. पण त्यांच्या आजूबाजूला लोकं आहेत. त्यांना हे घडायला नको.' 

'यामध्ये जो तेल लावलेला पैलवान आहे त्याची बुद्धीमत्ता कामाला आली आहे. उद्धवजी आजारी होते दुसरीकडे कोरोना होता त्याचा फायदा घेतला गेला. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जे लोकं आहेत त्यांनी त्याचा फायदा घेतला. मी मगाशी म्हटलं मी बोललो तर भूकंप होईल. मला पक्ष एकत्र आणायचा आहे. त्यामुळे तुटेल असं मी काही बोलणार नाही. बाळासाहेब असते तर असं घडलं नसतंच. त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांना जवळच घेतलं नसतं.' असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची साथ सोडण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी