Raj Thackeray: मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर? राज ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर...

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 27, 2023 | 17:36 IST

Raj Thackeray interview: मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

if mns only mla claim on party then what happen party chief raj thackeray gives this answer
Raj Thackeray: मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर? राज ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर...  |  फोटो सौजन्य: Twitter

MNS Chief Raj Thackeray Interview: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विविध प्रश्न विचारण्यात आली आणि या प्रश्नांची राज ठाकरेंनी सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आणि एकूणच राजकीय परिस्थिती याबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेलं बंड हे आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी आपण म्हणजेच शिवेसना असे म्हणत पक्षावर दावा केला. त्यानंतर या प्रकरणात निवडणूक आयोगाने आपला निकाल देत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड करत पक्षावर दावा केल्याने जर पक्ष त्यांचा होत असेल तर मनसेच्या एकमेव आमदाराने पक्षावर दावा केला तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. याच संदर्भात राज ठाकरेंना विचारण्यात आल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात...

हे पण वाचा : ... म्हणून डोळ्यातून वारंवार येतं पाणी

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

अजित पवार म्हणाले की, उद्या मनसेचे एक आमदार आहेत आणि त्यांनी जर पक्षावर, चिन्हावर दावा सांगितला तर निवडणूक आयोग ते मान्य करेल का? त्यांनी मनसेचं उदाहरण दिलं असलं तरी सर्व पक्षांच्या मनात ही भीती सध्या निर्माण झालीय का? या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं, महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे, झालंय... या विषयावर मी सविस्तर 22 तारखेला (गुढीपाडव्याला) शिवतीर्थावर बोलणार आहे.

पक्ष हातातून गेला हे दुर्दैवी झालं की चांगल्या माणसाच्या हातात शिवसेना गेली? या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं, मला कुठलाही ट्रेलर, टीझर दाखवायचा नाहीये तर मला थेट 22 तारखेला सिनेमाच दाखवायचा आहे. त्यामुळे या विषयावर मला आता काहीही बोलायचंय नाहीये.

हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?

सध्याची राजकीय स्थिती पाहून तुम्हाला एक राजकीय पक्ष प्रमुख म्हणून जर-तरच्या पलिकडे सर्व गेलं आहे असं वाटतं का? यावर राज ठाकरेंनी म्हटलं, राजकारणाचा चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. ज्या काही गोष्टी असतील म्हणजे विरोध असेल किंवा इतर गोष्टी असतील. या सर्व गोष्टी आमने-सामने असायच्या. बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं तेव्हा मी विधानभवनात गेलो होतो. सर्व आमदार बसले होते... मला कळतंच नव्हतं कोण कोणत्या पक्षातलं आहे. म्हणजे सध्या कोणी आला तर तो कुठला असं विचारवं लागतं. तो सध्या कुठे असतो रे... तर त्यावर ऐकायला येतं तो तिकडे गेला आता... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी