छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा दिला नाही तर किंमत चुकवावी लागेल : शिवसेनेला छावा संघटनेचा  इशारा 

कोल्हापूर घराण्यातील छत्रपती संभाजी महाराज यांना शिवबंधन घालण्याची अट शिवसेना घालत आहे. अशा अटी त्यांनी यापूर्वीच्या राज्यसभेवर गेलेल्या उमेदवारांना घातल्या होत्या किंवा त्यांना शिवबंधन घातण्यास सांगितले होते का.

If Shiv sena not give support to Chhatrapati Sambhaji Raje then they will pay the price Chhawa organization  warns
शिवसेनेला छावा संघटनेचा  इशारा  
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर घराण्यातील छत्रपती संभाजी महाराज यांना शिवबंधन घालण्याची अट शिवसेना घालत आहे.
  • शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी तात्काळ संभाजीमहाराज छत्रपती यांना पाठिंबा द्यावा,
  • भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल असा निर्वाणीचा इशारा छावा संघटनेने दिला आहे

मुंबई :  कोल्हापूर घराण्यातील छत्रपती संभाजी महाराज यांना शिवबंधन घालण्याची अट शिवसेना घालत आहे. अशा अटी त्यांनी यापूर्वीच्या राज्यसभेवर गेलेल्या उमेदवारांना घातल्या होत्या किंवा त्यांना शिवबंधन घातण्यास सांगितले होते का. शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी तात्काळ संभाजीमहाराज छत्रपती यांना पाठिंबा द्यावा, नाही तर भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल असा निर्वाणीचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. (If Shiv sena not give support to Chhatrapati Sambhaji Raje then they will pay the price Chhawa organization  warns)

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी माध्यमाशी बोलताना हा इशारा दिला आहे. 

शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थीनचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही आहे. तसेच शिवसेने व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला आणि आम्हाला आवडलेले नाही.

त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते. आतापर्यंत ४२ मते आम्ही जमा केली आहेत. तसेच इतर ५ ते ६ मते गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, नारायण आठवले, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का?? मग आता संभाजीराजेंनाच का..?? असा सवाल धनंजय जाधव य़ांनी उपस्थित केला आहे. 

पण सेनेला छत्रपतींसोबत न्याय करायचा नसेल तर आमच्या मतांवर पुढच्या वेळी तुमचे आमदार निवडून येतात कसे हे आम्ही पाहूच. 42 मतांचा आकड्याची जुळवाजुळव आम्ही सुरू केली आहे. 5/6 मते कमी आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही जाधव म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी