शिक्षणात खंड पडला म्हणून कधी निराश झालात तर डोंबिवलीच्या मनीषा राणेंची मार्कशीट नक्की पाहा, ४७ वर्षीय महिला झाली १० वीची परिक्षा पास

Maharashtra SSC Result : आज दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण आहेत तर काहीजण नापास देखील झाले आहेत. पण अशा विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही. यंदाच्या डोंबिवलीच्या एका ४७ वर्षीय महिलेचे परिस्थितीमुळे आठवीमध्ये शिक्षण थांबले नव्हते. पण मेहनतीच्या जोरावर आज त्या दहावी पास झाल्या आहेत.

If there is a break in education, if you are ever disappointed, look at the marksheet of Manisha Rane from Dombivali,
शिक्षणात खंड पडला तर, कधी निराश झालात तर डोंबिवलीच्या मनीषा राणेंची मार्कशीट नक्की पाहा, ४७ वर्षीय महिला झाली १० वीची परिक्षा पास ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आठवीमध्ये शिक्षण थांबलेल्या महिलेची गोष्ट व्हायरल
  • एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली
  • १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लॉ चे शिक्षण घ्यायचे आहे

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result) जाहीर झाला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत. तर अनेक विद्यार्थींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पण डोंबिवलीची एका ४७ वर्षीय महिला चांगली व्हायरल होत आहे. याच कारण म्हणजे या महिलेचे आठवीमध्येच शिक्षण अर्धवट राहिले आहे. मनामध्ये दहावी पास करण्याचे स्वप्न त्यांना झोपू देत नव्हते. म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळून या महिलेने आज अखेर दहावी क्रॅक केली. (If there is a break in education, if you are ever disappointed, look at the marksheet of Manisha Rane from Dombivali, a 47 year old woman has passed the 10th standard examinatio

अधिक वाचा : 

MSBSHSE SSC Result 2022 tricks and tips : दहावीचा निकाल सर्वांच्या आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स

आज दहावीचा निकाल लागला. अनेक मुले पास झाले आणि आनंदीत झाले. मात्र डोंबिवली मधील चक्क एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. मनीषा राणे असे या महिलेचे नाव असून डोंबिवली त्या सामाजिक काम करतात. तसेच त्या भाजप कल्याण ग्रामीणच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीचे कौतुक केले जात आहे.

अधिक वाचा : 

Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीला बसलेले ९६.९४ विद्यार्थी पास

मनीषा  राणे हे १९९३ साली ८ वी ची मी परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले. 1995 साली त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या मुंबईला आल्या. सासरची परिस्थिती देखील जेमतेम असल्याने त्या जेवण बनविणे, धुणी भांडी अशी कामे केली. गणेश नगर मधील महिलांच्या साथीने त्यांनी फंडचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. यादरम्यान एका व्यक्तीने मनीषा यांना तुम्ही काय शिकणार असे बोल लगावल्याने मनीषा यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.

अधिक वाचा : 

MSBSHSE SSC Result 2022 check Offline: दहावीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा

जुनी ८ वी पास असल्याने त्यान्हा  पदवीची परीक्षा देता आली. त्यानुसार २०२१ मध्ये त्यांनी सोशल सायन्स या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र  १० वी व १२ वी बोर्डाची परीक्षा राहिल्याने मनीषा यांही या परीक्षा देण्याचे ठरविले. कामातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत केला व परीक्षेत बसले. परीक्षेत त्यान्हा  भूमिती, बीजगणित या विषयाचे पेपर कठीण गेले होते, त्यामुळे त्याची थोडी धाकधूक होती की विषय सुटतो की नाही..परंतु त्या  चांगल्या मार्काने पास झाल्याने त्यांना अभिमान वाटू लागला असून मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि ते मी करणारच. १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लॉ चे शिक्षण घ्यायचे असल्याचे मनिषा राणे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी