मुंबई: 'उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बोलवल्यास आम्ही मातोश्रीवर (Matoshri) नक्की जाऊ, आनंदाने जाऊ. पण काही विशिष्ट लोकांना उद्धव ठाकरेंनी जरा दूर ठेवावं. तसंच सध्या आम्ही भाजपसोबत (BJP) असल्याने त्यांच्याशी देखील संवाद साधावा लागेल.' अशी अट आता शिंदे गटाकडून (Shinde Group) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे.
आज (७ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन कारभार स्वीकारला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण मातोश्रीवर जाण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाहा दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले.
'उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ, आनंदाने जाऊ. जेव्हा एखाद्या कुटुंबात असा प्रसंग येतो.. आणि आता काय झालेलं आहे की, ऑलरेडी शिंदे साहेब हे सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबतचे सगळे जण आणि भाजप एकत्र आलेले आहेत. म्हणजे नवीन एक कुटुंब तयार झालं. आता या कुटुंबामध्ये जर परत जायचं असेल तर कुटुंबामध्ये आम्ही एकटे नाही आहोत. आमच्यासोबत भाजप देखील आहे.'
अधिक वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंची केंद्रात वर्णी?
'आम्हाला बोलवताना त्यांना भाजपशी देखील चर्चा करावी लागेल. आम्हाला आशीर्वाद द्यावा लागेल. तसंच हे का घडलं आणि याला जे लोकं जबाबदार आहेत त्यांना.. आम्ही असं म्हणत नाही शिवसेनेतून काढून टाका. पण त्यांना थोडं तरी बाजूला ठेवा.'
'नाही तर अनेक लोकं असे आहेत की, आम्ही जेव्हा आमची कामं घेऊन यायचो तेव्हा ते आम्हाला सांगायचे की, आम्हाला ही कामं सांगा आम्ही ती उद्धव साहेबांना सांगतो. त्यासाठी आम्ही आमदार नाही झालेलो नाही.'
केसरकरांची राऊतांवर पुन्हा एकदा टीका
'इथे काय गोष्टी चालल्या आहेत हे राऊतांना माहितही नसतं. मी हे बोललो तर चुकीचंही ठरणार नाही की, राऊत हे जवळचे समजतात. ते खूप जवळचे पवार साहेबांच्या असतील. उद्धव साहेबांच्याबद्दल किती प्रेम करतात हे मला खरोखर माहिती नाही.'
'मला एवढंच सांगायचं आहे की, मी स्वत: चार-पाच महिने झाले सांगतोय. मला जेव्हा स्वत:ला जाणीव झाली की, शिवसेना धोक्यात येत आहे तेव्हापासून माझे प्रयत्न चालू होते की, साहेबांचं मन वळविण्यासाठी.' असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.