मुंबई : बंडाळी उफाळल्यामुळे ड्रॅमेज कंट्रोल करण्याचं मोठे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्यापुढे उभे ठाकले आहे. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेला (ShivSena) मोठा झटका बसला आहे, परंतु सेनेला आमदारांनंतर खासदार देखील जोरदार झटका देण्याच्या तयारीत दिसत आहेत. खासदाराच्या मागणी प्रमाणे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला तरच खासदारांचं बंड हे थंड होऊ शकणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
Read Also : महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाला पावसानं झोडपलं
येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि आमदार NDA चे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर एनडीएला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला तर शिवसेनेत बंड पुकारले जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या संदर्भात आज 'मातोश्री'वरील बैठक संपल्यावर शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती.
Read Also : 'मी शाळेत जात आहे' हे इंग्रजीत बोलताना शिक्षकाला सुटला घाम
शिवसेनेच्या खासदारांची ती मागणी असताना भाजपचे खासदार रामदास तडस सेनेच्या खासदारांविषयी मोठा दावा केला आहे. तडस याच्या दाव्यानुसार, शिवसेनेचे 12 खासदार भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेना सध्या मोठ्या बंडाळीने ग्रस्त झाली आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये खासदारांचे दबाव तंत्र सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. अशातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनी हा दावा केला आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेना पुन्हा एकदा नव्याने उभारली जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून नव्याने बांधणी सुरू आहे. बंडखोरीच्या काळात अनेक आमदार सोडून गेले होते, पण जे राहिले अशा आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले.
Read Also: भगवान वामन यांच्या आशीर्वादाने घरात नांदेल सुख, शांती
सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांनी भावनिक पत्र लिहिले आहे. 'आईच्या दुधाशी बेईमानी करू नका' हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहात निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले आहे. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ हीच प्रार्थना, अशा शब्दांत खुद्ध उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांचे आभार मानले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.