Kiran Pawaskar : राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू;किरण पावरस्कर

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 31, 2022 | 06:30 IST

अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या मागणीवर शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ समोर आणू असं म्हटलं आहे.

If you ask for resignation, show videos of Aditya Thackeray's liquor parties;Kiran Pawaskar
आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवणार शिंदे गट   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर गेले होते.
  • अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती.
  • काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत अब्दुल सत्तार यांचा व्हिडिओ ट्विट केला होता.

मुंबई: राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांचे पार्ट्यामधल्या दारू (alcohol) पितानाचे व्हिडीओ दाखवू, असा इशारा शिंदे गटाच्या किरण पावसकर यांनी दिला. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा दारुबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटातील नेते किरण पावस्कर यांनी उत्तर दिलं आहे. (If you ask for resignation, show videos of Aditya Thackeray's liquor parties;Kiran Pawaskar)

अधिक वाचा  : आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन

 पावसकर म्हणाले की, "ज्यांना नाईट लाईफचं आकर्षण आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं. त्यातून हे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे राजीनामे मागत आहेत. मंत्र्यांचे राजीनामे मागाल तर सगळ्या व्हिडीओसह तुम्हाला एक्स्पोज करू.अब्दुल सत्तारांचा दारूच्या वक्तव्यावरुन यांनी राजीनामा मागवला. आदित्य ठाकरे मिटिंग सुरू असताना दारुचे व्हिडीओ आहे, त्यांच्या पार्ट्यांचे व्हिडीओ आहेत. तुम्हाला किती व्हिडीओ बघायचे आहेत?"अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं आहे.  

 अधिक वाचा  :गुजरातमधील भीषण दुर्घटनेचा पाहा व्हिडिओ

गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर गेले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं. अब्दुल सत्तारांचा हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला.

अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या मागणीवर शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ समोर आणू असं म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी