Maharashtra Fort : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास होणार मोठी शिक्षा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 14, 2023 | 07:50 IST

If you drink alcohol on the any fort of Maharashtra, there will be a big punishment : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास (मद्यपान केल्यास) मोठी शिक्षा होणार आहे.

If you drink alcohol on the any fort of Maharashtra, there will be a big punishment
गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास होणार मोठी शिक्षा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास होणार मोठी शिक्षा
  • महाराष्ट्र सरकार करणार कायदा
  • सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

If you drink alcohol on the any fort of Maharashtra, there will be a big punishment : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास (मद्यपान केल्यास) मोठी शिक्षा होणार आहे. गडकिल्ल्यांवर दारू प्यायल्यास (मद्यपान केल्यास) किमान तीन महिने कारावास तसेच किमान दहा हजार रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

रायगड किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. महाराष्ट्रात 387 संरक्षित स्मारके आहेत. या स्मारकांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जिल्हा नियोजनपैकी 513 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. तसेच राज्यातल्या स्मारकांपैकी 75 ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शौचालये बांधण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. सर्व 387 स्मारकांवर त्यांच्याशी संबंधित माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. किल्ल्यांवरील अतिक्रमणे दूर करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सिंहगड आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

Onion Farmers: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

बीड - धक्कादायक! परळीत 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा लावला बालविवाह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी