Mumbai Rain Update : मुंबई : मुंबईत जुलै महिन्यात (july month) मुसळधार पाऊस (heavy rain) झाला होता. त्यानंतर ऑगस्टच्या (august month) सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. परंतु मुंबई आणि ठाण्यात (Mumbai and Thane) गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत सांताक्रूज (Santacruz) हवामान विभागाने ८६ मिमी पावसाची नोंद केली आहे. तसेच पुढील काही तासांत १०० मिमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर भागात ४० ते ५० किमी वेगाने वारे वहतील. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: High tide hits Marine Drive in Mumbai amid rainfall — ANI (@ANI) August 9, 2022
As per IMD, intense to very intense rain with gusty winds reaching 40-50 kmph very likely at isolated places in Mumbai, Navi Mumbai, Thane, Palghar till 10 am today. Orange alert for Mumbai & Thane today pic.twitter.com/znzyjw1hdQ
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरीत मिलन सबवेमध्ये पाणी भरल्याने बंद करण्यात आला होता.
मुसळधार पावसाचा फटका विमान वाहतुकीलाही बसला आहे. अनेक फ्लाईट्स उशिराने उडत आहेत. एअरपोर्टवर पोहोचण्यापोर्वी फ्लाईटची वेळ तपासून पहा असे आवाहन स्पाईएसजेट कंपनीने प्रवाशांना केले आहे. १० आणि ११ ऑगस्टला मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अधिक वाचा : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मोठा धक्का!
हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, रायगड, नाशिक, पुणे, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोडकसागर तलाव दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. तलावात १,२८,९२५ दशलक्ष लिटर (एमएल) पाणी साठले आहे. मोडक सागर तलावातून मुंबई शहराला दररोज ४५० एमएल पाणी पुरवठा होतो. मोडक सागर या आधी १३जुलै ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या २४ तासात या तलावात मुसळधार पावसाने 3,823 एमएल पाण्याची वाढ झल्याने आता दुसऱ्यांदा तलाव १०० टक्के भरले आहे. दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सात तलावांमधील पाणीसाठा जवळपास २१,००० दलघमीने वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
अधिक वाचा : शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नका, आमदार कैलास पाटलांचा भाजप सरकारला इशारा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.