आयएमडीने जाहीर केला मुंबईत ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई
Updated Jul 02, 2020 | 13:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय हवामान विभागाने(imd) मुंबईत ऑरेंज अलर्ट(orange alert) जाहीर केला आहे. पुढील दोन दिवसांत या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 

rain
मुंबईत जाहीर केला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच आता पाऊसही मुंबईसाठी मोठे आव्हान घेऊन येत आहे. कारण ३ आणि ४ जुलैला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Heavy Rain in Mumbai) हवामान विभागानुसार दक्षिण गुजरात आणि जवळच्या क्षेत्रात चक्रवर्ती वारे सक्रिय असल्याने मुंबईत मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने(imd)मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange alert) जाहीर केला आहे. स्कायमेटनेही असा अंदाज व्यक्त केला आहे की पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. 

देशातील ६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील काही तासांमध्ये देशातील ६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील दोन तासांत हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांच्या काही जिल्ह्ययांमध्ये मोठा पाऊस बरसू शकतो. 

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो. मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. दरम्यान, पावसाळ्यात आजार पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती राज्य सरकारने केली आहे. कोरोनाचे संकट असतानाच त्यातच आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांमध्ये विशेष काळजी लोकांना घ्यावी लागणार आहे. 

पावसाळ्यात रेड अथवा ऑरेंज अलर्टचा अर्थ काय?

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा विविध जागांवर वेगवेगळे अलर्ट जाहीर केले जातात. या अलर्टचे वेगवेगळे रंग असतात. जसे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, ग्रीन अलर्ट आणि येलो अलर्ट. तुम्ही बातम्यांमध्ये अनेकदा ऐकले असेल.

रेड अलर्ट - याचा अर्थ मुसळधार पाऊस. ज्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तेथे मुसळधार पाऊस होऊ शकतो. २४ तासांत २०० मिमीपर्यंत पाऊस बरसू शकतो. मुंबईत जर हा अलर्ट देण्यात आला तर मुंबई पोलीस, बीएमसी, फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, रेल्वे आणि इतरांना तातडीने सूचना दिल्या जातात. 

ऑरेंज अलर्ट - याचा अर्थ संबंधित अधिकाऱ्यांना गरजेची पावले उचलण्यासाठी तयार रहावे लागेल. यावेळी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो आणि परिस्थिती कोणत्याही क्षणी बिघडू शकते. यासाठी सगळ्यांनी अलर्ट राहण्याचे आवाहन केले जाते. 

ग्रीन अलर्ट - म्हणजे त्या भागात कोणत्याही प्रकारची कारवाईची गरज नाही. या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी