विनायक मेटेंच्या अपघाताविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनातून पुढे आली महत्त्वाची माहिती

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 22, 2022 | 20:01 IST

Important information came out from the statement given by Deputy Chief Minister Fadnavis about the accident of Vinayak Mete : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख दिवंगत विनायक मेटे यांच्या अपघाताविषयी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. या निवेदनातून मेटेंच्या अपघाताविषयी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

Important information came out from the statement given by Deputy Chief Minister Fadnavis about the accident of Vinayak Mete
विनायक मेटेंच्या अपघाताविषयी पुढे आली महत्त्वाची माहिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विनायक मेटेंच्या अपघाताविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनातून पुढे आली महत्त्वाची माहिती
  • ११२ क्रमांकावर फोन करून मेटेंच्या ड्रायव्हरने चुकीची माहिती दिली
  • मेटेंच्या अपघात प्रकरणी तपास सुरू आहे

Important information came out from the statement given by Deputy Chief Minister Fadnavis about the accident of Vinayak Mete : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख दिवंगत विनायक मेटे यांच्या अपघाताविषयी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. या निवेदनातून मेटेंच्या अपघाताविषयी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

महाराष्ट्र हादरला ! हात पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, पहा घटनेचा व्हिडीओ

विनायक मेटे यांच्या कारचा ड्रायव्हर एकनाथ कदम याने अपघातानंतर ११२ क्रमांकावर फोन करून बोगद्यापाशी असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांची टीम बोगद्याजवळ गेली, त्यांनी बोगद्याच्या दोन्ही बाजूला तपासले पण तिथे कोणीही नव्हते. यानंतर रायगड पोलिसांना माहिती देण्यात आली. रायगड पोलिसांची टीम एक्सप्रेस वे वर आली आणि अपघात स्थळी पोहोचली. हे ठिकाण बोगद्यापासून बरेच लांब होते. मेटेंचा चालक भांबावला होता की नाही हे माहिती नाही. पण त्याने ११२ क्रमांकावर फोन करून दिलेली माहिती चुकीची होती. आता हा फोन खरा होता की खोटा, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मेटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण सविस्तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

नियमानुसार एक्सप्रेस वे वर ट्रॉलर सारख्या अवजड वाहनाने शेवटच्या लेनमधून प्रवास करायचा असतो. पण घटना घडली त्यावेळी ट्रॉलर मधल्या लेनमधून जात होता. यामुळे मेटेंच्या कारच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करता येत नव्हते. अखेर तिसऱ्या लेनमध्ये जाऊन मेटेंच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तिथेही एक वाहन समोर होते. तेव्हा मेटे यांच्या ड्रायव्हरने ट्रॉलर आणि त्या वाहनाच्या मध्ये असलेल्या थोड्या जागेतून कार काढण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हरचा अंदाज पुरता चुकला. यामुळे विनायक मेटे आणि त्यांचा अंगरक्षक कारमध्ये  बाजूला बसले होते, त्या बाजूला ट्रॉलरची जोरदार धडक बसली. या अपघातात विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला असा डॉक्टरांचा अंदाज आहे. सविस्तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही बाब नेमकी स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

अपघात झाला त्यावेळी एक वाहन एक्सप्रेस वे वरून जात होते. या वाहनातील व्यक्तीने दिलेल्या माहितीआधारे आयआरबीची अँब्युलन्स सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचली आणि मेटे यांना घेऊन गेली. पण तोपर्यंत विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सहा लेनचा एक्सप्रेस वे आठ लेनचा करण्याची सूचना

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य शासनाला सहा लेन (मार्गिका) असलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे आठ लेनचा करण्याची सूचना केली. सध्या एका (मुंबईच्या) दिशेला तीन आणि दुसऱ्या (पुण्याच्या) दिशेला तीन लेन अशा सहा लेनचा एक्सप्रेस वे आहे याऐवजी एका (मुंबईच्या) दिशेला चार आणि दुसऱ्या (पुण्याच्या) दिशेला चार असा आठ लेनचा एक्सप्रेस करावा असे अजित पवार म्हणाले. अवजड वाहनांसाठी दोन्ही (मुंबईच्या आणि पुण्याच्या दिशेला) दिशांना प्रत्येकी दोन लेन राखीव ठेवाव्या अशीही सूचना अजित पवार यांनी केली. पघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. मात्र असा वाद न करता ज्या पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती आधी मिळेल त्यांनी आधी घटनास्थळी पोहोचावं. यासाठी कडक आदेश द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.  मेटेंच्या अपघाताची सखोल चौकशी करावी अशीही मागणी अजित पवार यांनी केली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांची सूचना आणि मागणी या दोन्ही बाबतीत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे संकेत दिले. सध्या मिसिंग लिंकचं काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास मदत होईल. अतिरिक्त लेनबाबतची सूचना प्रत्यक्षात आणता येईल का, याची पडताळणी करण्याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करेन,' असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी