SSC HSC Exam । मुंबई : दहावी-बारावीतील (SSC HSC Exam)विद्यार्थ्यांची बोर्डाची (board exam) परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे राज्यात 15 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध(corona rules) लागू आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होतील, परीक्षा पुढे जातील का, असा संभ्रम होता, मात्र, परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार (Time Table) ऑफलाईनच (offline)होतील, अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत (written exam) ती परीक्षा सोयीने कधीही घेता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यातील कोरोना वाढत असला, तरीही बहुतेक रुग्णांना कोणतीच लक्षणे नाहीत. रुग्णालयातील व्यक्तीना ऑक्सिजन (oxgyen), व्हेंटिलेटर्सवरील (ventilators) इतकी आवश्यकता नाही. जे आहेत त्यांचे प्रमाण कमी आहे. लसीकरण झाल्याने सिरिअस रुग्णांचे प्रमाण फार कमी आहे. परीक्षेपूर्वी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण(vaccination) केले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असा बोर्डाला विश्वास आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा सर्वप्रथम असून त्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या वेळेत होईल.
दहावीची लेखी परीक्षा ( SSC Written Exam) 15 मार्च ते 18 एप्रिलपर्यंत तर बारावीची लेखी परीक्षा ( HSC Written Exam)4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, कोरोना वाढत असल्याने प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षेवरुन विद्यार्थ्यांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये संभ्रम आहे. तरीही, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 18 दिवसांचा आणि दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 22 दिवसांचा वेळ दिला आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयांनी कोरोनाची स्थिती पाहून ही परीक्षा त्या कालावधीत कधीही, त्यांच्या सोयीने घ्यावी, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परंतु, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही शिक्षण मंडळाने केल्या आहेत.
दहावी-बारावीतील बहुतेक विद्यार्थी (70 टक्के) ग्रामीण भागातील आहेत. दहावीची 72 तर बारावीची परीक्षा 160 विषय आणि आठ माध्यमातून होते. ग्रामीण भागातील अपुऱ्या सुविधांमुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आगामी परीक्षा ऑफलाईनच होणार असून अजूनपर्यंत नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल केला नसल्याने विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे 32 लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावीची परीक्षा
एका वर्गात कमीत कमी विद्यार्थी अन् एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था
दहावीचे विद्यार्थी 72 तर बारावीचे विद्यार्थी 160 विषयातून आणि आठ माध्यमातून देतील परीक्षा
पेपर सोडविण्यासाठी अर्ध्या तासाचा ज्यादा वेळ असेल; परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
कॉलेज, शाळास्तरावर प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत कधीही घेता येईल परीक्षा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.