मुंबई : उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 4 ते 11 मे दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
सीईटी परीक्षेच्या तारखा पुढे गेल्यानंतर आणि त्या तारखा जाहीर केल्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षाकरिता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कार्यालयाकडून 4 ते 11 मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.