मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी सामान्यांच्या बजेटमध्ये (budget) परवडेल अशा म्हाडाच्या घरांना लोकांची पहिली पसंती असते. पण आता म्हाडाची (MHADA) घरं घेणं सोपं राहिले नाही. कारण आता म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील (housing project) घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर म्हाडाच्या घरांच्या क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे.
गृहनिर्माण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणं अत्यंत आवश्यक असते. आतापर्यंत अत्यल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी प्रति महिना 50 हजार ते 75 रुपये आणि उच्च गटासाठी रुपये 75 हजाराच्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यात बदल करत ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली आहे.
ही मर्यादा वार्षिक उत्पन्नानुसार पाहुया,- अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाकडून या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसंच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे.
त्याचसोबत घराच्या क्षेत्रफळामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यापुढे म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे. उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असे क्षेत्रफळ यापुढे लागू असणार आहे. गृहनिर्माण विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.