DGP Rajneesh Seth । पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत. 

Important points in the press conference of Director General of Police Rajneesh Seth
DGP रजनीश सेठ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
 • राज्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 • या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत. 

मुंबई : मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत.  (Important points in the press conference of Director General of Police Rajneesh Seth)

या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि राज्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्यातही एक बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असे अवाहन पोलीस महासंचालकांनी केले. तसेच, कोणी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

राज्याचे पोलीस महानिरीक्षक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद (Maharashtra DGP Rajnish Seth press conference) घेतली. पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षकांनी म्हटलं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे :-

 1. महाराष्ट्र पोलीस दल कोणत्याची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे.
 2. सर्व पोलीस दलाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुस्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
 3. याआधी समाज कंटक आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 4. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत.
 5. एसआरपीएफ, होम गार्ड यांना मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत.
 6. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे.
 7. कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
 8. राज्यातील जनतेला आव्हान करतो की त्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखावी, पोलिसांना सहकार्य करावं.
 9. राज ठाकरेंच्या भाषणासंदर्भात औरंगाबाद पोलिसांकडून संपूर्ण अभ्यास करण्यात आला आहे.
 10. औरंगाबाद भाषणाच्या अनुशंगाने आवश्यक ती कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते पोलीस करतील.
 11. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार.
 12. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी