Eknath Shinde : आनंद दिघेच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी केली होती धक्कादायक चौकशी... सांगताना शिंदे संतापले

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Important points of Eknath Shinde's speech at BKC
 एकनाथ शिंदे यांचे बीकेसीतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले.
 • आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
 • सत्तेसाठी तुम्ही वडिलांचे विचार विकले. होय गद्दारी झालेली आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे भेटायला आले त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धक्कादायक बाब उघड केली आहे. 

आपल्या भाषणात आनंद दिघे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांनी पक्ष किती वाढवला, त्यांचे काम किती असे न विचारता त्यांची ठाण्यात प्रॉपर्टी किती असा प्रश्न विचारला होता. हे मी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आनंद दिघे यांचा संघटनेतील आणि पक्षातील दबदबा वाढत होता. त्यांचे पाय छाटण्याचे काम तुम्ही केले असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला. 

कोणी मोठे झाले ते यांना बघवत नाही. कोणी नवे घर घेतले, नवी गाडी घेतली हे त्यांनी बघवत नाही. कार्यकर्त्याने काही चांगले कपडे घातले तर यांना बघवत नाही अशी वृत्ती उद्धव ठाकरे यांची असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला. 

 एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... (Important points of Eknath Shinde's speech at BKC)
 

 1.  शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक असलेल्या शिवसैनिकांना माझा नमस्कार. या विराट जनसमुदायला मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर मी नतमस्तक होतो. या जनसमुदायाने सिद्ध केलंय की शिवसेना कुणाची. 
 2.  आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची. ही शिवसेना शिवसैनिकांची. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची. 
 3.  सत्तेसाठी तुम्ही वडिलांचे विचार विकले. होय गद्दारी झालेली आहे. पण गद्दारी ही २०१९ ला झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली. जनतेशी गद्दारी झाली. 
 4.  तुमची गद्दारी जनतेला कळली, म्हणून तर एवढा जनसमुदाय इथे लोटला आहे. आता जनतेने ठरवलं  आहे. गद्दारांना साथ द्यायची नाही. 
 5.  आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा. 
 6.  मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे,मी हे ठाकरेंना सांगितलं 
 7.  आम्ही केलेली गद्दारी केली नाही. हा गदर आहे. बाळासाहेबांच्या विचारांची क्रांती आहे. 
 8.  आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. 
 9.  ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे. 
 10.  कोविड-कोविड करुन तुम्ही सर्वांना घरात बसवलं, तुम्ही मंदिरं बंद केली, दुकानं बंद केली. 
 11.  राज्यातही PFI ला ठेचलं जाईल, PFI बाबत पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भूमिका योग्य आहे. 
 12.  आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान. 
 13.  केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PFI वर घेतलेले निर्णय योग्य आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलं आहे. 
 14.  जरा विचार करा: तुमचे बंधू राज ठाकरे तुमच्या सोबत राहिले नाहीत. नारायण राणे सोडून गेले.  स्मिता ठाकरे वाहिनी, निहार ठाकरे इथेच बसलेत. का बसलेत? आता तरी याचा विचार करा. 
 15. तुम्हांला मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष पूर्ण करायची होती. शिवसेनेचे होत असलेले पानिपत तुम्ही पाहत बसला होतात.
 16. बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही.
 17. एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते.
 18. 2.5 वर्ष का गप्पं बसलो? आमच्या देवाचं अंश तुम्ही म्हणून शांत बसलो.

 19. आम्हाला रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली.

 20. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही खिल्ली उडवता. त्यांनी जगामध्ये आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण केलीय. जगातल्या लोकांना त्यांनी भुरळ घातली आहे.

 21. काँग्रेस पक्ष आहे पण त्याला अध्यक्ष नाही, पंतप्रधानांची टिंगल करणाऱ्यांचं काय झालं?

 22. हे शिवसैनिक आहेत म्हणुम मी शिवसेनाप्रमु्ख आहे असं बाळसाहेब म्हणायचे.

 23. आता तुमच्याकडचे लाखो शिवसैनिक गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी मी पणा कायम आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.

 24. तुमचं work from home आणि आमचं work without home

 25. उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही.

 26. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून,मी दुसऱ्याला मदत केली. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला नाही.
 27. बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजत होते. तुम्ही त्यांना घरगडी समजत होतात.
 28. नोकर के साथ क्यू जाते हो. मालिक के साथ आओ. असा फोन थापांना आला होता. अश्या पद्धतीने पक्ष नाही वाढत नाही.
 29. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं.
 30. पूराच्या पाण्यातून जाऊन आम्ही पूरग्रस्तांना मदत दिली. असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अनेकांना मदत केली.
 31. अनेक पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तुम्ही त्याची दखल घेणार की नाही? असं असताना तुम्ही कुणाला सांभाळलं ते सांगा?

 32. दाऊद आणि याकुब मेनन चे हस्तक होण्यापेक्षा आम्हाला मोेदी शहांचे हस्तक व्हाय़ला केव्हाही आवडेल.

 33. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेनं पुराच्या पाण्यात उडी मारली. डॉक्टर घाबरले पण मी त्यांना म्हटलं घाबरु नका, मी बुडालो तरी तुम्हाला बुडून देणार नाही.

 34. कटप्पा म्हणून ही टीका केली गेली. कटप्पा तर हा स्वाभिमानी, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता.

 35. तुम्ही म्हणता, भाजपने खंजीर खुपसला, तर शिवतीर्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत का शपथ घेतली. तेव्हा लाज वाटली नाही का?

 36. बीकेसीवर प्रचंड गर्दी झालीय, मला सांगितलं असतं तर काही माणसं शिवाजी पार्कात पाठवली असती. 

 37. काहींनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार.

 38. दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली असं तुम्ही विचाराल असं वाटलं. पण तुम्ही मला आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी विचारली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी