Thorat- Patole Crisis: भाच्याच्या बंडानंतर मामाने सोडलं मौन; बाळासाहेब थोरात यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 06, 2023 | 08:39 IST

Thorat- Patole Crisis: सत्यजीत तांबे यांचे मामाश्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं आहे. बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Impossible to work with Patole; Thorat write letter to party high command
पटोलेंसोबत काम करणे अशक्य; थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली.
  • काही लोक गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. - थोरात
  • जे राजकारण झालं ते व्यथित करणारे आहे, ही वस्तूस्थिती आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. - थोरात

Thorat- Patole Crisis: मुंबई  :  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या(Nashik Graduate Constituency)निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत राहिली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे सत्यजीत तांबे यांचा बंड आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने पिता-पुत्राविरुद्धात केलेली कारवाई. यासर्व प्रकरणावर सत्यजीत तांबे यांचे मामाश्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं आहे. बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.  (Impossible to work with Patole; Thorat write letter to high command)

अधिक वाचा  : डोळ्यांवर चष्मा नको तर करा हे घरगुती उपाय

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या वेळी सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीमुळे पिता-पुत्रावर काँग्रेस पक्षाने  कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमात बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली.    

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

सत्यजीत तांबे यांचे आरोप 

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवरून झालेला घोळ कसा आणि कोणामुळे झाला, हे समोर आणले होते.काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस एच. के. पाटील यांनी तांबे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची,याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे सांगितले होते.

अधिक वाचा  : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरुद्धात FIR दाखल

त्यानंतर ही जागा सत्यजित तांबे यांनी लढवावी,असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, त्यांना नाशिक पदवीधरऐवजी औरंगाबाद व नागपूर येथील एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा फॉर्म दिले गेले. त्यात डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहूनच फॉर्म पाठवले गेले, असे दावे सत्यजित तांबे यांनी पुराव्यांसह केल्यामुळे पटोले यांची मोठी पंचाईत झाली. 

पटोलेंसोबत काम करणं अशक्य 

या प्रकरणावर थोरात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते, शेवटी बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. निवडणुकीत आणि निवडणूकी आधी होत असलेल्या राजकारणाविषयी त्यांनी पत्र लिहून पक्षश्रेष्ठींना याची माहिती दिली आहे. पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून सध्याच्या प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी कळवले आहे.

अधिक वाचा  : KCR यांची महाराष्ट्रातून दिल्लीच्या दिशेने वाटचाल

काँग्रेस पक्षात निष्ठेने इतकी वर्षे आपण काय काय काम केले, याचाही थोडक्यात गोषवरा या पत्रात देण्यात आला. थोरात यांच्या या पत्रामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार की, पटोले यांचे खांदे दिल्लीतील त्यांचे ‘गॉडफादर’के. सी. वेणुगोपाल अधिक भक्कम करणार, यावर थोरात यांचे काँग्रेस पक्षातील भवितव्य अवलंबून आहे.

माझ्या पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेणार 

आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'एक महिना संगमनेर तालुक्याच्या जनतेपासून दूर राहिलो, असा माझा कोणताच कालखंड नाही. मागच्या एका महिन्याच्या कालावधीत खूप राजकारण झालं. सत्ताबदलानंतर संगमनेर तालुक्यावर राजकारण होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. संगमनेरमधील कार्यकर्त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही ते प्रयत्न केले जात आहेत. विकासाचं सुरू असलेलं काम बंद पाडण्याचा प्रयत्न होतोय. 

संघर्षातून संगमनेर तालुका मोठा झालाय, सत्ता आपणही बघितली,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 'सत्यजीत तांबे चांगल्या मताने विजयी झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जे राजकारण झालं ते व्यथित करणारे आहे, ही वस्तूस्थिती आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, कुठे बाहेर बोललं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षपातळीवर आणि माझ्या पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत,' असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

'काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. विधानपरिषदेच्या राजकारणात आपल्याला भाजपमध्ये नेऊन पोहोचवलं. भाजपच्या तिकीटाचं वाटपसुद्धा करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आपली पुढील वाटचाल त्याच विचाराने होणार आहे,' असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी