अवघ्या ४८ तासात 'या' दोन मंत्र्याच्या खात्यांमध्ये अदलाबदल, पाहा काय झालं नेमकं?

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 14, 2019 | 18:27 IST

राज्यात मंत्रिमंडळाचं खातेवाटपाला ४८ तास पूर्ण झालेले नसताना दोन मंत्र्यांच्या खातेवाटपात अदलाबदल केले आहेत.

in just 48 hours these two ministers portfolios were switched on see what happened
अवघ्या ४८ तासात 'या' दोन मंत्र्याच्या खात्यांमध्ये अदलाबदल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • महाविकास आघाडीच्या सरकारमधील दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये अदलाबदल
 • छगन भुजबळ आणि जयंत पाटलांच्या खात्यांमध्ये अदलाबदल
 • पाहा दोन्ही मंत्र्यांची कोणकोणती खाती बदलली

मुंबई: महाविकासआघाडीचं सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाला ४८ तास पूर्णही झालेले नसताना दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता देखील दिली असल्याचं समजतं आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर जवळजवळ १२ ते १३ दिवसांनी खाते वाटप करण्यात आलं. खातेवाटपाला झालेल्या विलंबाबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. त्यातच आता अवघ्या ४८ तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. 

पाहा नेमकी कोणत्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे: 

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे.

पाहा बदलानंतरचं खाते वाटप नेमकं कसं आहे: 

छगन भुजबळ 

 1. ग्राम विकास
 2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 
 3. राज्य उत्पादन शुल्क
 4. कौशल्य विकास आणि उद्योजकता
 5. अन्न व औषध प्रशासन 
 6. अन्न व नागरी पुरवठा
 7. अल्पसंख्याक विकास आणि कल्याण

जयंत पाटील

 1. वित्त आणि नियोजन
 2. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 
 3. गृहनिर्माण
 4. सार्वजनिक आरोग्य 
 5. ग्राहक संरक्षण
 6. सहकार व पणन 
 7. कामगार 

एकनाथ शिंदे

 1. गृह मंत्रालय
 2. नगर विकास 
 3. वने
 4. पर्यावरण 
 5. पाणी पुरवठा आणि स्वच्छता 
 6. मृद आणि जलसंधारण
 7. पर्यटन, 
 8. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
 9. संसदीय कार्य
 10. माजी सैनिक कल्याण 

सुभाष राजाराम देसाई

 1. उद्योग आणि खनिकर्म
 2. उच्च व तंत्रशिक्षण 
 3. क्रीडा आणि युवक कल्याण 
 4. कृषी
 5. रोजगार हमी योजना
 6. फलोत्पादन
 7. परिवहन
 8. मराठी भाषा 

विजय उर्फ (बाळासाहेब) भाऊसाहेब थोरात 

 1. महसूल 
 2. उर्जा व अपारंपारिक उर्जा
 3. वैद्यकीय शिक्षणशालेय शिक्षण,
 4. पशु संवर्धन
 5. दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय 

नितीन राऊत 

 1. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 
 2. आदिवासी विकास
 3. महिला व बाल विकास 
 4. वस्त्रोद्योग 
 5. मदत व पुनर्वसन
 6. इतर मागासवर्ग 
 7. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग
 8. विमुक्त जाती
 9. भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी