मुंबईत चालुक्य एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून उतरले, कोणीही जखमी नाही

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2022 | 01:08 IST

In Mumbai, 3 coaches of Chalukya Express derailed, no injuries : दादर आणि माटुंगा या दोन स्टेशन दरम्यान दादर पुदुचेरी चालुक्य एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून उतरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

In Mumbai, 3 coaches of Chalukya Express derailed, no injuries
मुंबईत चालुक्य एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून उतरले, कोणीही जखमी नाही 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत चालुक्य एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून उतरले, कोणीही जखमी नाही
  • चालुक्य एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून उतरले
  • शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास अपघात

In Mumbai, 3 coaches of Chalukya Express derailed, no injuries : मुंबई : दादर आणि माटुंगा या दोन स्टेशन दरम्यान दादर पुदुचेरी चालुक्य एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून उतरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास अपघात झाला. 

ऑनलाइन आरोग्यविमा विकत घेताय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेली गदग एक्स्प्रेस नियोजीत वेळापत्रकानुसार दादरच्या प्लॅटफॉर्म सातच्या जवळून जाणाऱ्या रुळावरून पुढे जाणार होती. याच मार्गावरून चालुक्य एक्सप्रेस पुढील प्रवासाकरिता निघाली होती. तांत्रिक कारणामुळे दोन्ही गाड्यांमधील वेग आणि वेळ हे नियोजन चुकले आणि गदग एक्सप्रेसने धडक दिल्यामुळे चालुक्य एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून उतरले. दोन्ही गाड्यांमध्ये प्रवासी होते. पण वेग कमी असल्यामुळे अपघात झाला तरी कोणीही जखमी झालेले नाही. 

रुळावरून उतरलेले डबे बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघातामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या निवडक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. अपघातामुळे फास्ट अप आणि डाऊन रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. फास्ट ट्रॅकवरील लोकल स्लो ट्रॅकवर आणल्यामुळे स्लो ट्रॅकवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी