Video : लोकलमध्ये चार महिलांचा जबरदस्त राडा, सीट घेण्यावरुन झिंज्या उपटल्या

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 18, 2022 | 17:04 IST

Mumbai Local Train Women's Fight : सकाळीची ऑफिसची घाई असो किंवा ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याची लगबग ही लोकल ट्रेन  कायम खचाखच भरलेली असते. या गर्दीच्या लोकलमध्ये घुसण्यावेळी आणि जागा पकडण्यावरुन नेहमी वाद होत असतात. या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  हा व्हिडिओ महिलांच्या डब्बामधील आहे. एका सीटवरुन चार महिलांना तुफान राडा केल्याचा हा व्हिडिओ असून या महिलांनी एकमेंकांच्या झिंज्या उपटल्या आहेत.  

In the local, four women's fight for seat , video viral
सीटसाठी चार महिलांचा लोकलमध्ये जबरदस्त राडा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • या गर्दीच्या लोकलमध्ये घुसण्यावेळी आणि जागा पकडण्यावरुन नेहमी वाद होत असतात.
  • या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.
  • हा व्हिडिओ महिलांच्या डब्ब्यामधील आहे.

Mumbai Local Video : मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन जीवनाचा एक भाग बनली आहे.  या लोकल ट्रेनवर लाखो मुंबईकरांचं (Mumbai news)आयुष्य अवलंबून आहे.  एक लोकल ट्रेन सुटली तरी आपल्या पुढील कामांच पूर्ण वेळापत्रक कोलमडत असतं. ह्यामुळे  अनेकजण वेळेवर लोकल पडकण्यसाठी धडपडत असतो. त्यात इतर वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचा खर्च हा कमी असल्याने बहुसंख्य लोक लोकलने प्रवास करत असतात. (In the local, four women's fight for seat , video viral )

अधिक वाचा  :

सकाळीची ऑफिसची घाई असो किंवा ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याची लगबग ही लोकल ट्रेन  कायम खचाखच भरलेली असते. या गर्दीच्या लोकलमध्ये घुसण्यावेळी आणि जागा पकडण्यावरुन नेहमी वाद होत असतात. या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  हा व्हिडिओ महिलांच्या डब्बामधील आहे. एका सीटवरुन चार महिलांना तुफान राडा केल्याचा हा व्हिडिओ असून या महिलांनी एकमेंकांच्या झिंज्या उपटल्या आहेत.  

अधिक वाचा  :

व्हिडिओ व्हायरल 

या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी आहे. एकमेकांना चिपकून महिला तरुणी उभ्या आहेत. अशात लोकल ट्रेनमधील सीटवरुन एक नाही दोन नाही, चार महिलांनी जोरदार राडा केला. केस ओढताना, धक्काबुक्की करताना या व्हिडिओमध्ये दिसतं आहे.

अधिक वाचा  :

लोकल ट्रेनमध्ये दंगल 

या महिलांनी लोकल ट्रेनच्या डब्ब्याला दंगलीचा आखाड करुन टाकला. या महिलांची दे धपाधप wweची जबरदस्त फाईट पाहिला मिळतं आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठल्या लोकल ट्रेनमधील आहे याबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाही.मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर हा व्हिडिओ @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी