मुंबई: Mumbai Local Molestation News: मुंबईत लोकलमध्ये विनयभंगाची (molestation) घटना घडली आहे. त्यामुळे मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) बोरिवली स्टेशनला (Borivali station) महिलेसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. महिला कामानिमित्त अंधेरीला जात असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेनं कामानिमित्त प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाला आहे. हा प्रकार महिलांच्या डब्यात घडला आहे. बुधवारी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान ट्रेनमध्ये महिला डब्यात घुसून एका व्यक्तीनं महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.
अधिक वाचा- 'या' 10 राज्यांना IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या पावसाची परिस्थिती
या घटनेनंतर पीडित महिलेनं अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
महिलेच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासंबंधीत घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तपासून अंधेरी पोलिसांनी तपासासाठी चार पथकं तयार केल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची माहिती मिळवली. मात्र त्यात आरोपी हा मनोरूग्ण असल्याची माहिती समोर येतेय. सध्या अंधेरी आणि बोरिवली रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
जुलैमध्ये घडली होती घटना
मुंबईत याचवर्षी जुलै महिन्यात अशीच एक घटना घडली होती. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात दोन तरूणींचा एका व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला चर्चगेट रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. योगेश सूर्यवंशी (24) असे त्या आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथे राहतो. पीडित तरूणी स्थानक परिसरात असलेल्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढत होत्या. पैसे काढून त्या एटीएम सेंटरबाहेर आल्यानंतर तेथे असलेल्या योगेशने एका तरुणीचा विनयभंग केला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.